TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत संत कान्होपात्रा

संगीत संत कान्होपात्रा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - नारायण विनायक कुळकर्णी
(१९-११-१९३१). संगीत : मास्तर कृष्णराव, विनायकबुवा पटवर्धन


(अभंग, चाल : लावणीची)
जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला झालो । तुमच्या उष्टयासाठी आलो ।
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्टयासाठी ॥२॥


(अभंग, राग : पिलू)
धाव घाली विठू आता चालू नको मंद ।
बडवे मज मारितो ऐसा कांही तरि अपराध ॥१॥
जोडुनिया कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उत्तरी परि राग नसावा ॥२॥


(राग : पटदीप, ताल ; त्रिवट, चाल : करीमा कर्मा कर)
पति तो का नावडे । जो मान्यशा मिळवी यशास ॥धृ०॥
कीर्ती जाया । प्रीती वाही । त्या कोपे परिहास ॥१॥


(अभंग, राग : धानी, ताल : धुमाळी, भजनी ठेका)
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपूरा । भेटेन माहेरा आपुलीया ॥२॥
सर्व सुकृताचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन परब्रह्मा ॥३॥
बाप रखुमादेवी वरा विठठलाची भेटी । आपुलीया सेवेसाठी
येऊनि राहे ॥४॥


(राग : तिलोककामोद, ताल : एकताल, चाल : मनमे मोहन विराजे)
नुरले मानस उदास । गुंगवि घ्यान प्रभूचे ।
पदकमली वास रुचे ॥धृ०॥ पुलकित काया अहा ।
असुख सकल हो नाश भवभय गेले लयास ॥१॥


(राग : तिलंग, ताल : त्रिवट, चाल : तदियना तारेदानी)
अशी नटे ही चारुता । सतनु काय विसरवि स्मृति ।
वरित सार्थता ॥धृ०॥ नयनि तरलता, नाचत खेळत ।
विभवि नव दिसत हास्य लयास ॥१॥


(राग : बहार, ताल : त्रिवट, चाल : तूतु बाहु देखना)
शर लागला तुझा गे, बघ जीव झाला वेडा पिसा हा ॥धृ०॥
जडे गडे तव ठायी आस । देई गोड चुंबनास मधुरशा ॥१॥
नको अशी तरि राहू दूर । बाहुपाशि सौख्य सार । मृदुलशा ॥२॥


(राग : भीमपलास, ताल : एकताल, चाल : बन्सीधरके चरन)
देवा धरिले चरण । भक्ति सुगति जगि मजला ।
भाव बोल रुचवि कोण ? सकल तुज विभो मान ॥धृ०॥
सान थोर जीवांसि । रक्षितोसि ह्रषीकेशी ।
अचल तुझ्या पदी दीन । भय नुरवी होत लीन ॥१॥


(अभंग, राग : झिंजोटी, ताल : केरवा)
पतित तूं पावना । म्हणविसी नारायणा ॥
तरी सांभाळी वचन । ब्रीद वागविशी जाण ॥
याति शुद्ध नाही भाव । दुष्ट आचरण स्वभाव ॥
मुखी नाम नाही । कान्होपात्रा शरण पायी ॥

१०
(राग : ललत, ताल : केरवा)
दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ॥
मी तो यातिहीन । न कळे काही आचरण ॥
मज अधिकार नाही । भेट देई विठाबाई ॥
ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ॥

११
(राग : भैरवी, ताल : केरवा)
अगा वैकुंठीच्या राया । अगा विठ्ठला सखया ॥
अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥
अगा पुंडलिक वरदा । अगा विष्णू तू गोविंदा ॥
अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आता ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:01.5170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कर्तब

  • न. १ चातुर्य ; कसब ; कर्तृत्व ; शिताफी , २ ( हिं .) गायनांतील कौशल्य , आलाप , ताना वगैरे . ( सं . कर्तव्य ) 
  • n  Art, capability or skill. The arts of song. 
  • ०गारीदारी स्त्री. १ कर्तृत्व ; कौशल्य ; करामत ; हुशारी . २ गानकौशल्य ( हिं . कर्तब + फा . गार ) 
RANDOM WORD

Did you know?

vastudoshavar udakshant ha paryay ahe ka ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site