TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत जागती ज्योत

संगीत जागती ज्योत

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर
(८-४-१९३३). संगीत : सुरेशबाबू माने

१ (राग : मांड, ताल : धुमाळी)
हासवि नाचवि ह्रदयाला । हा ह्रदयनाथ टाकूनि गेला ॥धृ०॥
भासवि हा रवि रजनीला । का रजनीकांत हा दिवसाला
हा काय रंजविल ललना सुमना । स्वानंदे आनंदे झाला ॥१॥

२ (राग : कर्नाटक तोडी, त्रिताल)
जगि आभास हा दाविला । वितराग तो झणि मालविला
उगाचि विकास दुरावला । धादांत वेदांत खुळावला ॥धृ०॥
करगत हरविली झळकत मिरविलि अविरत दिपविल प्रतिभा अमला ॥१॥


तू बोलल्याविना मी नाहीच बोलणार । बोलाविल्या ना पाऊल टाकणार ॥
पुसल्याविना स्वयें तूं नाहीच सांगणार ।
पाहोनि रीत तूझी तैसाचि वागणार । कोडें मना सुटेना
कांही न होत बोध । भिन्नत्व सत्य हें की आभास हा विरोध

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:59.2970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

limited period

  • पु. मर्यादित अवधि 
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.