मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत तुलसीदास

संगीत तुलसीदास

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१९-३-१९२८). संगीत : गोविंदराव टेबें


नच पार नाद निधिला । विधितनया वीणा, वाही, तरुनि जावया ।
पैलतीर परि ना दिसला ॥धृ०॥
ब्रह्मनाद नटवी गानकला श्रुति पंचम जी, श्रुतिसि गोचरा ॥
स्वरलेखनि जरि बांधिली तिला । हीननाद होई स्वरमाला ॥१॥


रामरंगि रंगले मन । आत्मरंगी रंगले । रामरूप जाहले मन ॥
विश्वरंगि रंगले । चित्त दंग जाहले ॥धृ०॥
चरण नेत्र गुंतले । भृंग अंबुजातले ।
भवतरंग भंगले । अंतरंग दंगले ।


प्रभुपदपंकजलीनां, कवीना । बंधन की स्थलकालहि साहेना ॥धृ०॥
नच धाना, नच मदांधा जनां । कविजन मानी ।
सोवोनी राघव नाम सुधा करिती सुगाना ॥


परमगहन पाशां, विधिच्या कोण चुकवि । मनुजा घेरि दुराशा ॥धृ०॥
प्रणयपाश गळि पडला । जीव जिवा सांपडला ।
परिणय हा बंध परि उदयाला । गति दे अविनाशा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP