TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत देव दीनाघरी धावला

संगीत देव दीनाघरी धावला

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - बाळ कोल्हटकर

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गांठी ।
भेटीत रुष्टता मोठी ॥

त्या कातरवेळा थरथरती कधीं अधरीं ।
त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी ॥
कितिदां आलों-
जमलों-

रुसण्यावांचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी ।
भेटीत रुष्टता मोठी ॥

कधीं तिनें मनोरम रुसणें । रुसण्यांत उगीच ते हंसणें ॥
म्हणून तें मनोहर रुसणें । हसणे रुसणें-रुसणें हसणें ॥
हंसण्यावरती रुसण्यासाठी । जन्मजन्मींच्या गांठी ॥
भेटीत रुष्टता मोठी ॥

कधी जवळ सुखाने बसलों ।
दु:खांत सुखाला हंसलों । कधीं गहिंवरलों-
कधीं धुसफुसलों-सागरतीरीं आठवणींनी-

वाळूंत मारल्या रेघा । जन्मासाठीं जन्म जन्मलों ।
जन्मांत जन्मली न गट्टी । भेटींत रुष्टता मोठी ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:03.7030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खोरी

 • स्त्री. व्यापारांतील तोटा . नुकसान बुड . ' नवनीत शेलकें हरे । आणिलें खोरी । ' - राल ६६ .  
 • पुस्त्री . खोरें ; फावडें ( सं . क्षुर ; प्रा . खुर ; हिं छुरा ) 
 • पुस्त्री 
  1. कोणत्याहि पानाचा केलेला एकटांकी द्रोण . डोणा ; डोणी .
  2. ( कों .) पावसाळ्यांसाठीं माडाच्या झावळीची झांप विणुन त्याची वळवुन केलेली खोळ ; इरलें ; इरल्यासारखी सरळ घोंगडीची खोळ ; हिच्या उलट कमरमोडी .
  3. खोडी ; दरा ; खोरें .
   
 • स्त्री. पोफळीच्या विरीचा द्रोण . ( खोरें ) 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणता शब्द योग्य आहे ? नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site