TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत हाच मुलाचा बाप

संगीत हाच मुलाचा बाप

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर
(७-९-१९१८).  संगीत : वझेबुवा

१ (राग : मियामल्हार, ताल : एकताल, चाल : कोहे लाडली)
कवितासुत लालित झाली क्षणकाल तरी सुफलित परिगणना कविमना ॥धृ०॥
अरसिक जरि कुणी काव्या गुण दोष दे फार अनुदार मनानें ।
परि मग होई अतितर कविह्रदया वेदना ॥१॥

२ (राग : शुद्ध कल्याण, ताल : झपताल, चाल : धनधान तेरो)
कमला जनांचे घेई बलिदान । विभवानुभूता जगि जरि दिसे मान ॥धृ०॥
मांगल्य आहे नरकी धनाचें । गति खोल चांचल्य योगे मिळे जाण ॥१॥

३ (राग : जीवनपुरी, ताल : त्रिवट)
कंपित अति शंकित मति सुंदर कर हा । उभयांते ।
निजकंकणाहि वेदांसम बोले ॥धृ०॥
या गोड ह्रदयांतलि, डंका निनादे ।
जलकण निटिली जमले मंत्राक्षत झाले ॥१॥

४ (राग : बिलावल, ताल : त्रिवट)
परिणाम होई सुखाचा अपमानिता । रीती सतत ॥धृ०॥
क्षणकाल ज्याला । जय लाभ झाला । अपमान त्या येई अंती ॥
विजयान्विता ॥१॥

५ (राग : सुवासुगराई, ताल : त्रिवट, चाल : दीं तना तेरे दानी)
या धनागमकानी वर-पितयां । सहज लाभे श्वानता मनुजी वसना ॥धृ०॥
सतत वदती जना । न सुतसुखलाभ मना । वाटते मितभाषिता नराधम मानिता ॥१॥

६ (राग : गारा, ताल : झपताल, चाल : मन लगाके राखो)
मुखरता कां शोभे प्रणयमदयुवा ॥धृ०॥
ह्रदयानुरागास । मधुवचहि दे त्रास गति मूक वचनास । मिलनानुयोगा ॥
वचने वचननाश । आरंभ कलहास । प्रेमा अति विकास ।
जरि मूकता ॥१॥

७ (रग : सोहा कानडा, ताल : एकताल, चाल : साहेब नव मुझे बुलावे)
हा धनमदयुन जगात सान गणित सकलां ॥धृ०॥
वित्त शाठय लागले । नच उदार त्यामुळे । मानदान त्या नकळे । अजापुत्र गमला ॥१॥
द्रव्यधूम वाटला । म्हणुनि अंध जाहला ॥ स्वप्रकाश त्या कुठला । महामूढ पशुता ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:59.0770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

poultry

  • न. कुक्कुटपालन 
  • पु./अ.व. पाळीव खाद्य पक्षी 
  • न. कुक्कुटपालन 
  • न./अ.व. पाळीव खाद्यपक्षी 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Are we transliterating everything? Do we copy that from some other websites?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.