खंडोबाचीं पदें - पद ४४

श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.


बणु बसली डुई घालून जी । भांग भरला भंडारानी शिनगारला नाहीरुन ।

बालुबाल मोती खेळून जी । वेणीला गुंफूनशानी मुदराखडी ग लाऊन ।

वेणीला गोंडे तीन जी । चाल ।

वेणी बिंदली माथ्यावरुन जी । बाणु स्त्रीरुप संगीन जी ।

हैती ऐना घेउनी जी । मुख न्हाळी कामीन जी ।

करकर करबीडे चावले तांबुळ रंगले लाल ।

देव बाणुवर खुश्याल जी । सीता राहिली उभी सारंग पाजळल्या दीपमाळ ।

देव बाणूवर खुश्याल जी । पातळ जरी ढवळे जी ।

कपाळी ल्याली कुंकु केश कुरळे । लावण्यरुप पिवळे जी ।

सैतावर जडली मिठी वट कवळे । गळ्यामंदी नवरसहार जी ।

मल्हारी हिचा भरतार जी । झाला वारुवर तीर तार जी ।

आगडधिम चौघडे वाजती पुढेंच पिवळी ढाल ।

देव बाणूवर खुश्याल जी । शीता राहिली ।

बाणुने करुनि शिनगार जी । लखलखलख दिवटया जळती ।

होतो जयजयकार । फक्तासि आनंद फार जी ।

मलु सायबाचे लडीबाळ जी थरथरा कापती काळ जीं

बोले भिका खंडुबाळ भड भड भड भड निशाण भड लाल

देव बाणुवर खुश्‍शाल जी

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP