खंडोबाचीं पदें - पद ४२

श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.


सांबाचे जसें कैलासगिरीवर शिखर जी ।

जडाचे सिंहासन सोनेरी मखर जी ।

वर चतुर्भुज महाराज पद्मधारी चक्र जी ।

शीव तोडी कानी कुंडल शोभती मखर ।

जसा सूर्य मूर्य कांतीचा ।

गाभा झळकती तेज जी ।

दैत्यास्तव औतार मारली पैज जी ।

कडेपठारचे महाराज कानडे राज जी ।

आचानागउदीम नागधीम नीत चौघडे वाज जी ।

पाहाडाचे पायी आकृती जैसे शिवपिंड जी ।

चौकुनी तुटले कडे घडे आथंड जी ।

कर्‍हा नीरा वाहे दोही थडया गंगेची लोंड जी ।

असे नीत कर्‍हेचे स्नान करी मार्तंड जी ।

आंगीं भंडार्‍याचें भूषण टिळक शीरी साजे जी ।

शनवारी आमची पूजा फुलांची शेज जी ।

कडेपठारचे । पितांबर कसली कास शिरी मुकुट जी ।

आंगामदी लाया पीवळे बर्‍हानपुरी सीट जी ।

लालीलाल अंगावर शाल रुईफुल काठ जी ।

हातामदीं खंडा डौल पठाण थाट जी ।

आदी मावा म्हाळसा गंगा नाव साजे जी ।

बाजुला प्रधान हे गडी सवाई शिर ताजे जी ।

कडेपठारचे । शनिवारीं सायंकाळीं सभा घनदाट जी ।

देवलोकीं पिवळा वाना वाजती घांट जी ।

सोन्याची गड जेजुरी जगीं बोभाट जी ।

नवमीला भंडार तोल तो नीट जी ।

वर गिरीवर झेंडा भडकती ध्वज ।

आछा नागधीम नागधीम नीत चौघडे वाज जी ।

नऊ दिवसाचा नऊ माळासन औवधारी जी ।

दाव्या दिवसीं शिलंगण आलें निघाली स्वारी जी ।

वरसाचिक भाविक भक्त मिळाले पठारी जी ।

अपार पेटल्या दिवटया रात्र आंधारी जी ।

या गड जेजुरीची स्वारी आली सामोरी जी ।

या दोहींच्या भेटी रमणीय महाद्वारीं जी ।

दणदणा सुटती तोफा मिळाली फौज पुढें चंद्रजोत महीताप बाणाची मौज जी ।

कडेपठारचे । त्रीकुरघटपर आसन संगम त्रिवेणी जी ।

हा टपर गोलाट गुंफा भिकोनी जी ।

रोईरा कपाकमोच्या कजला हारी धुनी जी ।

कुई बीरल पछाना आलक चुरश निरवानी जी ।

कडेपठारचे महाराज उनकी बाजी जी ।

बापुने कनाया पदलंपट हारी चरणी जी ।

श्रीभगवान गिरीचा मठ शंखधुनी वाजे जी ।

मल्हारी वाघासी सात याला साजे जी । कडेपठारचे ।

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP