खंडोबाचीं पदें - पद ४१

श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.


आठ दिवसा आईतवारी जी मागल तुमची वारी जी ॥

तुझ्या भंडार्‍याचा भडीमार मल्ली तुझ्या दरबारी ॥

वाजल्या शंख बहीरी जी ॥

काठया कावडयाचा भार नगारे निशाण लावीत जोड ॥

मल्हारी नाम तुझें गोड जी ॥

धरीन आपल्या हृदयीं करीन स्मरण लावीन जोड ॥

मल्हारी नाम तुझें बहु गोड । पूजा होती या देवाची जी ॥

जाई मोगर्‍याच्या कळया हार वाहीला देवासी ।

तयारी सोमवतीची मूर्ति काढल्या बाहेरी पालखी दिसे मोत्याची जोड ।

मल्हारी नाम तुझे बहु गोड ॥

स्वारी निघाली देवाची जी ॥

या कर्‍हेबाईच्या तिरी गरदी राव झाली भंडाराची ।

होती आंघोळ देधाची । पंच अमृताची गरदी ।

लंगर तुटती ताडताड । मल्हारी नाम तुझें बहु गोड जी ।

स्वारी आली जेजुरीला जी । रस्त्याने धनी मिरवत सखा मल्हारी ।

चालला सदरेला देव बसला जी ॥

मानकरी उजव्या बाजूला ।

रोज मारा ज्याचा त्याला । भवानी दासाचा छेला जी ।

छंद त्यानी देवाचा केला जी ।

माग तो सर्व तुजला तुझ्या रे पायाची केली जोड । मल्हारी नाम तुझें बहु गोड.

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP