खंडोबाचीं पदें - पद ४३

श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.


सेज केली महाली जी । लाविल्या समया सात आरे हो वाट पाहेली सार्‍या रात्रीं जी ।

देवा माझी त्रासली नेत्र । आरे हो ।

कोठे गेली होती स्वारी जी ॥ चाल ॥

कोणाच्या मंदिरीं जी । खरें सांगा मल्हारी जी ।

मला कळले आंतरी जी । लुब्ध तुम्ही जाला बाणुला आरे हो ।

म्हाळसा म्हणे देवाला । कां मशीं धरला अबोला रे

आरे हो म्हाळसा म्हणे देवाला । कोणा यातीची बाणाई जी ।

आपला लक्ष तिच्या ठाईं अरे हो । मशीं बोलत कां नाही जी ।

घातली तिनें तुम्हा द्धाहीर आरे हो । धनगरीन आरबट जी ।

आंगाची घाण घुरंट जी । चल देवा घरी उठ जी ।

धरी देवाचें मनगट जी । घेऊन गेली महालाला रे अरे हो ।

म्हाळसा म्हणे देवाला जी कां मशीं धरला अबोला जी ।

लिंगाईत म्हणवितासी । आवघा भ्रष्टाकार करतां अरे हो ।

शिवधर्म बुडविता जी । डोळे असतां आडात पडतां रे अहो ।

असे काय मल्हारीजी । सोन्याचा सुरी जी ।

मारुनि घेवा उरी जी । जिवाची यादगिरी जी ।

सांगतां जीव माझा दमला रे आरे हो ।

म्हाळसा म्हणे देवाला । कां मजशी धरला अबोला ।

सगु म्हणे देवा जी । सदोदित घडो तुमची सेवा अरे हो जी ।

असे आषईवर देवा जी । लक्ष चरणापासी ठेवा रे अरे हो मल्हासुर मर्दिला जी ।

त्रिभुवनी आनंद झाला जी । देव पावतो भक्ताला जी ।

खंडु वाघ्या गुरगुरला जी । धासत पडली काळा रे आरे हो ।

म्हाळसा म्हणे । कां मशीं धरला अबोला ।

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP