खंडोबाचीं पदें - पद ४०

श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.


वृक्ष कुळीवरती पक्षी रावे गजबजती ।

कागाचा कलकलाट दारी चिमण्या चिवचिवती ।

बक ते तळ्यापाशी कोकिळ आंबेबनी रहातीः

तास पिंगळे उंच वृक्षावर मोर ठाव करती ।

कुंभ घेऊनिया देवांगना पाण्याला जाती ।

कागापुर जेजुरी शुद्ध सतरावी कर्‍हा वाही ।

चाल । सुगंधी उटणे बानु म्हाळसा लाविती ग जी ।

घंगाळा उष्ण देव चौरंगा हाती ग जी ।

पिवळें पितांबर कस्तुरी टीळा लेती ग जी ।

उभी फुलाई माळीण गळा हार घाली ती ग जी ।

रंभाई सिंपीण शेल्याला दोरा भरती ग जी ।

एक महालाम्ध्यें मुरळी गुण आवडीने गाती गजी ।

मिळवणी । आलंकार पिवळे आंगावर शालजोडी पिवळी ।

दिले चंदनाचे पाट बसाया घालिती रांगोळी जी ।

उठ लवकरी मलुराया म्हाळसा बोले प्रातःकाळीः

उठ नेत्री लाविते तुम्हाला सण आज दीपवाळी जी ॥१॥

छंद मंडप झालरी फुलाचे फुलाचे पडदे मंदेरी

ठाईं ठाईं उदबत्या झाले सुगंधिक झारी ।

घ्या दिवसा जळे मशाल पडला प्रकाश महाद्वारी ।

सडे सुगंदीक आंगणेवर रांगुळ्या पाट ।

हारोहार समई जळती ऋषीपंगतीचा थाट ।

बाणु म्हाळसा लाविती । हाती सोन्याचें ताट ।

मिळवणी । अमृतफळ नारंगी गोड द्राक्षें आरे केळी ।

पुढें तबकामध्यें ठेविती महालामध्यें मुरळी ।

ऊठ लवकरी । चाल । सुगंधीक मुखीं विडे रत्‍नलालाची प्रभा दिसती ।

भरगच्ची पोशाख अंगामधीं ना माव गणदस्ती ।

चुन्या करुन पोशाक पुढें तबकांत आणुन ठेविती ।

जोमदार करी हार हरोहर हुकूमामरहाती ।

करुन सर्व शृंगार म्हाळसा पदद्यांतून पाहाती ।

डुबदागिने बाणाई शृंगार लेती । लखलखत बीजल्याचे तारे तुटती ।चाल।

लाग जर चरणी नाद डिंडिम हे उठती ।

ऐकून नाद वरवार वेधु मती । मिळवणी ।

जरी पदराचा झोक शेलारी निरगुची पिवळी ।

केळ कर्दळीचा गाभा म्हाळसा फुलाची पाकळी ः

उठ लवकरी । त्रिगुण सभा घनदाट बैसली देव तेतीस कोटी ।

आले नारद तुंबर सभेमंदी सांगती गोष्टी ।

वाघे मुरळ्या गजर हजर पुढें वाजती घाटी ।

अनुहत गगनांत गरजती या भेटीची दाटी ।

मुखीं दगीर प्रसन्न गोड नाम बापुच्या कंठी ।

हरि भाऊची जोडी रीण । नभत्तन्नर गाटी ।

चाल । पूर्वीचें सुकुरितः फळ आले शेवटी ।

मलुनाम अक्षर वर लिहिलें लल्लाटीं ।

माझे सहस्त्र अपराध । देवा घाला ते पोटी ।

मिळवणी । करा कृपेची छाया बा गा द्या मला चरणाजवळी ।

हेंच मागणे तुम्हा मागतो नाम त्रिकाळी । उठ लवकरी.

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP