खंडोबाचीं पदें - पद २२

श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात.


नागडधीम नागडधीम चौघडे वाजती ।

कातु करणे शेडे गरजती ॥

बहिरव पाठीसी प्रधान सारिती ।

पालखींत म्हाळसापती ॥

वर छत्री अबदागिरी चवरी ढळती ।

दोही बाजु डंके वाजती ॥

खूप जाळी झालर गोडे की व शोभती ।

हिरे कोंदणांत चमकती ॥

अंबारी सहीत भजन खर्‍यानें चालती ।

घोडे कोतवाल चालती ॥

जसी लाट समुद्र थाट यात्रा दाटली ।

स्वारी कर्‍हे जाता पाहिली ॥

सुखी यात्रा जेजूरी जागा चांगली ।

स्वारी कर्‍हे जाता पाहिली ॥

सुखी यात्रा जेजूरी जागा चांगली ।

स्वारी कर्‍हे जाता पाहिली ॥१॥

आघाडी चमकली बुधवार पेठला ।

जाती होळकराच्या भेटीला ॥

धाव चाल धुमाळी रीघ नाहीं वाटला ।

थवे गरदी थाट दाटला ॥

सडी स्वारि चमकली ठरुन कला वादीला ।

चकविले घोडेस्वाराला ॥

रोहिचित्त सांवरे पळ सुटला हरणाला ।

शिकारखाना सोडला ॥

आसी खेळत खेळत स्वारी कर्‍हेवर आली ।

स्वारि करे जातां पाहिली ।

सुखी श्री जेजुरी साधन साधती मोजी घटका पळ ।

दुधी स्नान होती आंघोळ ।

जसे सूर्याचे तेज कर्‍हे जप शुद्ध भागिरथी केवळ ।

एकवीस स्वर्गावर कर्‍हेचे मूळ शुद्ध सतरावीचे जळ,

दिले पिवळे डेरे असंख्यात देवळ ऋषि मंडळ रम्य स्थळ

चौफेर दुकान नदर पेट रोखली पहा तहान भूक हारपली बरे सुखी यात्रा ॥२॥

रंभाईच्या महालीं देवाची बैठक । सभा बस इंद्रादिक ।

सख्या नावी ऐना घेऊन । उभा सन्मुख करी सूर्यबिंब लखलख ।

अंगी चंदन मैलागिरी सुवास सुरेख ।

कस्तुरी भाळी टिळक घाली पाट रांगोळ्या ताट ।

जडले माणिक आंत चांदीच्या वाटया चक्क

ऋद्धिसिद्धि वाढिती खीर साखर स्वयंपाक ऋषि जेवती आंबोलीक ।

आंचुनी पानाची पट्टी रमाईनें दिली । सुखी यात्रा स्वारी कर्‍हे जाता पाहिली ।

कुच केले कर्‍हेचे चपळ चाल स्वारीची पुढे बैठक

घालवडीची घेती ल्हेज कलावे हारजित घोडेस्वाराची रानोमाळ

दवड फौजेची रवि अस्तमान काळोखी रात्र आवसाची पाहा ।

दिवटया हावई दारुची, पुढें चंद्रज्योत महीताप प्रभा फाकली ।

स्वारी रस्त्यानें चालली अशी मिरवत मिरवत

स्वारी किल्ल्यावर आली सभा बारव्हारी बैसली

गुरु मुकुंद गिर बोलले गोडी लागलि स्वारी वापुनी गारिली बरे सुखी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP