मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
श्री विष्णूची आरती

श्री विष्णूची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.

आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें । भक्तीचे भूषण प्रेमासुगंध अर्पिले ।
अहं हा धूप जाळू श्रीहरीपुढे । जंव जंव धूप जळे । तंव तंव देवा आवडे ।
रमावल्लमदासे अहं धूप जाळिला । एकारतीचा मग प्रारंभ केला ।
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा । समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।
हरीख हरीख हातो मुख पाहतां । चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था ।
सदभवालागी बहु हा देव भुकेला ।रमावल्लभदासे नैवेद्य अर्पिला ।
फल तांबूल दक्षिणा अर्पीली । तयाउपरी नीरांजने मांडिली ॥
आरती आरती करू गोपाळा । मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥ धृ ॥
पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली । दृश्य हे लोपलें तथा प्रकाशांतळी ।
आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपलें ।सुरवर सकळीक तटस्थ ठेले ।
देवभक्तपण न दिसे कांही । ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ॥ आरती.॥    

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP