दत्ताची शेज आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता ।
चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ.॥

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥१॥
 
पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती ।
ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥२॥
 
आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला ।
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥३॥
 
दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें ।
दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥४॥
 
भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला ।
मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥५॥
 
अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला ।
निरंजनी सद्‌गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP