मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
छत्रपती शिवाजी महाराजांची आरती

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


जयदेव जयदेव जय शिवराया ।
या या अनन्यशरणा आर्या ताराया ॥धृ ॥

आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला ।
आला आला सावध हो शिवभूपाला ॥
सद्‌गदिता भूमाता दे तुज हाकेला ।
करूणारव भेदुनी तव ह्रदय न का गेला? ॥१॥

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी ।
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी ॥
ती पूता भूमाता म्लेच्छांही छळता ।
तुजवीण शिवराया तिज कोण दुजा त्राता? ॥२॥

त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलो ।
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ॥
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया ।
भगवन्‌ भगवद्‌गीता सार्थ कराया या ॥३॥

ऎकुनिया आर्यांचा धावा गहिवरला ।
करूणोक्ते स्वर्गी श्रीशिवनृपी गहिवरला ॥
देशास्तव शिवनेरी घेई देहाला ॥
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता तो झाला ।
बोला तत्‌श्रीमत्शिवनृप की जय बोला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP