मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
मनोबोधाची आरती

मनोबोधाची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.



मनोबोधाची आरती
puja aarti
Download
वेदांचे जें गुह्य शास्त्रांचें जें सार ।
प्राकृतशब्दांमाजी केला विस्तार ॥
कर्म उपासना ज्ञान गंभीर ।
ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ॥१॥
 
जय देव जय देव जय मनोबोधा ।
पंचप्राणें आरती तुज स्वात्मशुद्धा ॥ध्रु॥
 
दोन शतें पांच श्र्लोक हे जाण ।
श्रवणें अर्थें साधक पावति हे खूण ॥
परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण ।
यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP