मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
आरती काळभैरवाची

आरती काळभैरवाची

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ॥
दीनदयाळा  भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ॥
देवा,  प्रसन्न हो मजला ॥धृ॥
धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी ।
उग्र भयंकर भव्य मूर्ती परि, भक्तासी तारी ।
काशीक्षेत्री नास तुझा तूं, तिथला अधिकारी ।
तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ॥
पळती, पिशाच्चादि भारी ॥आरती...॥१॥
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव किर्ती ।
क्षुद्र जीवा मी अपराध्यांना, माझ्या नच गणती ।
क्षमा करावी कृपा असावी, सदैव मजवरती ।
मिलिंदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ॥
देवा, घडो तुझी भक्ती ॥आरती...॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP