मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
संत सावता माळी महाराजांची आरती

संत सावता माळी महाराजांची आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


श्री संत शिरोमणी सावता महाराजांची आरती
जय संता जय भक्ता ।जय सावत्या श्रेष्ठा ।
अगाध ज्ञान तुझे ।थोर प्रतापी वरिष्ठा ॥१॥धृ.॥
 
माळियाचे वंशी । घेऊनिया अवतार ।
सकळिकांचा पूर्णपणे केला त्वा उध्दार ॥२॥ जय संता जय
 
संपूर्ण भक्तज्ञान । सकल वेद सार ।
देव त्वा साठविला । चिरूनिया उदर ॥३॥ जय संता जय
 
देवे तुज गौरविले । जन्मोजन्मी साह्य केले ।
दुर्जने तुज जासिले । ते दैव फजित झाले ॥४॥ जय संता जय
 
वश्वरूप बोध ठेवा । काशिबाशी दिधला ।
सकल संता भक्तभाव ।गृहस्था श्रमी दाविला ॥५॥ जय संता जय संता ॥
 
पूर्ण ज्ञानी जीवन्मुक्त । भक्तिज्ञान विसावा ।
आरणी दाखाविला । पुर्ण पाविञ ठेवा ॥६॥ जय संता जय
 
भिकू शरण आला तुज । पुर्ण अनन्य भावा ।
जागृत महिमा दावोनी । व्यक्त केला नीज ठेवा ॥७॥ जय संता जय

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP