अधिक मास आरती
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.
जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम । सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥ धृ० ॥
दीन म्हणोनी कृष्णे उद्धार केला ॥ निज नामे 'पुरुषोत्तम' धन्य तुला केला ॥
दाने त्यागे स्नाने पूजा जप माला ॥ व्रताचरण फलदायी निश्चय ठरवीला ॥
निःस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥
जय जय अधिकमास ० ॥१॥
पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला । मेधावी-कन्येला तो नच आवडला ।
परि शिवपूजा करण्या सांगुनिया तिजला ॥ पांडवपत्नी म्हणूनी जन्म धन्य केला ॥
वनवासी पंडुसुता कथिले महिमान ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥
जय जय अधिकमास० ॥२॥
अधिक मासामाजी दाने जे देती । दीप निरंतर देवापुढती लाविती ॥
राधाकृष्णांची ही पूजा जे करिती ॥ अथवा उपवासा मासभरी धरिती ॥
अनारसे तेहतीस जामाता दान ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥
जय जय अधिकमास० ॥३॥
दृढधन्व्याला पोपट करितो उपदेश ॥
गतजन्मीची सांगे पुण्याई त्यास । अधिक मासी घडता स्नाने उपवास ॥
पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास ॥ सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण ॥
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥
जय जय अधिकमास० ॥४॥
रानी मणिग्रीवाते उग्रदेव बोले ॥ पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले ॥
त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले ॥ चित्रबाहु म्हणुनिया वैभव भोगियले ॥
सहज जरी व्रत घडले तरि होई धन्य ॥ सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥
जय जय अधिकमास० ॥५॥
कदर्यु आख्यान नारायण कथिती ॥ दुर्गति होऊनियाही प्राप्त पुण्य अंती ॥
वानर-जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती ॥ मासभरी उपवासे तयास होई ती ॥
कथा पुराणा मधल्या कित्येक अन्य ॥
सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य ॥
जय जय अधिकमास० ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2026

TOP