मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
श्री खंडोबा महाराज तळी आरती

श्री खंडोबा महाराज तळी आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


॥ जय मल्हार ॥
बोल खंडेराव महाराज की जय ॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार ॥
हर हर महादेव ॥ चिंतामण मोरया ॥
भैरोबाचा चांदोबा ॥ अगडबंब नगारा ॥
सोन्याची जेजुरी ॥ मोत्याचा तुरा ॥
निळा घोडा ॥ पाई तोडा ॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा ॥
गळयात कंठी ॥ मोहन माळा ॥
ङोईवर शेला ॥ अंगावर शाल ॥
सदा हिलाल ॥ जेजुरी जाई ॥
शिकार खेळी ॥ म्हाळसा सुंदरी ॥
आरती करी ॥ देवा ओवाळी ॥
नाना परी ॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा ॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका ॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार ॥
 
********************
 
आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी ।
निळा घोडा, पाव में तोडा ।
मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।
अंगावर शाल, सदाही लाल ।
म्हाळसा सुंदरी, आरती करी ।
 
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।
बोला सदा आनंदाचा येळकोट
खंडेराव महाराजकी जय
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदीचा उदय उदय
भैरीचा चांग भले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज की जय
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
चिंतामणी मोरया
आनंदाचा उदय उदय
भैरीचा चांग बले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज कि जय
 
********************
बोल खंडेराव महाराज की जय ॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार ॥
हर हर महादेव ॥ चिंतामण मोरया ॥
भैरोबाचा चांदोबा ॥ अगडबंब नगारा ॥
सोन्याची जेजुरी ॥ मोत्याचा तुरा ॥
निळा घोडा॥ पाई तोडा ॥
कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा ॥
गळयात कंठी ॥ मोहन माळा ॥
अंगावर शाल ॥ सदा हिलाल ॥
जेजुरी जाई ॥ शिकार खेळी ॥
म्हाळसा सुंदरी ॥ आरती करी ॥
देवा ओवाळी ॥ नाना परी ॥
देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा ॥
खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका ॥
बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP