मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
कार्तिकेय आरती ( मराठी )

कार्तिकेय आरती ( मराठी )

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


सदया सगुणा देवा तारकसंहारी
कृत्तिकानंदन षण्मुख जै असुरांतकारी ।
अघहारी सुखकारी शक्तिदंडधारी,
मंगलरुपा देवनायका आत्मज त्रिपुरारी ।
 
जयदेव जयदेव जय स्वामी षण्मुखा,
सद्भावे ओवाळु प्रेमानी ओवाळु
आरती सुरभूपा ॥ जयदेव...
 
भयकृत भयनाशन ही नामें तुझे देवा,
विबुधादिक पद्मासन वांछिति तव सेवा ।
नाव तुझे जपता निज तुझे दासा,
संकटवारी भक्तांचा तू करी शत्रुनाशा ॥
 
लावण्यरुप तुझे तेज: पुंजाळराशी,
अवतरला कैलाशी देव तारावयासी ।
उत्साह सुरवरां देवमंडळी प्रसन्न होसी,
देवांचा नायक विश्वाला रक्षिसी ॥
 
षष्ठीचा दिवशी व्रत जे कोणी करिति,
संपती संतती निश्चय सर्व लाभति ।
मंगळ चा दिवशी जे कोणि भजति,
प्रसन्न तु होतो देवसेना चा पति ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP