मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
वटपौर्णिमा आरती

वटपौर्णिमा आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.

अश्वपती पुसता झाला ॥ नारद सागंताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत ॥ सावित्री ने कां प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळे ॥ मनी निश्चय जो केला ॥
आरती वडराजा ॥१॥
 
दयावंत यमदूजा। सत्यवंत ही सावित्री।
भावे करीन मी पूजा। आरती वडराजा ॥धृ॥
ज्येष्ठमास त्रयोदशी। करिती पूजन वडाशी ॥
त्रिरात व्रत करूनीया। जिंकी तू सत्यवंताशी ।
आरती वडराजा ॥२॥
 
स्वर्गावारी जाऊनिया। अग्निखांब कचळीला ॥
धर्मराजा उचकला। हत्या घालिल जीवाला ।
येश्र गे पतिव्रते। पती नेई गे आपुला ॥
आरती वडराजा ॥३॥
 
जाऊनिया यमापाशी। मागतसे आपुला पती। चारी वर देऊनिया ।
दयावंता द्यावा पती ।
आरती वडराजा ॥४॥
 
पतिव्रते तुझी कीर्ती। ऐकुनि ज्या नारी ॥
तुझे व्रत आचरती। तुझी भुवने पावती ॥
आरती वडराजा ॥५॥
 
पतिव्रते तुझी स्तुती। त्रिभुवनी ज्या करिती ॥ स्वर्गी पुष्पवृष्टी करूनिया ।
आणिलासी आपुला पती ॥ अभय देऊनिया । पतिव्रते तारी त्यासी ॥
आरती वडराजा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP