मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह| अन्नपूर्णा देवीची आरती विविध आरती संग्रह श्रीनृसिंहाची आरती श्री राधाजी आरती श्री कृष्णाची आरती अधिक मास आरती अन्नपूर्णा देवीची आरती माँ बगलामुखी आरती माँ बगलामुखी आरती बगलामुखी देवी आरती श्री संत बाळूमामा आरती माता ब्रह्मचारिणी की आरती छठ मातेची आरती चिले महाराजांची आरती श्री चित्रगुप्त आरती दशावतारांची आरती दत्ताची शेज आरती दीपारती दिव्याची आरती धन्वंतरि आरती अन्नपूर्णा देवीची आरती देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. Tags : Aartiannapoornaअन्नपूर्णाआरती अन्नपूर्णा देवीची आरती Translation - भाषांतर श्री अन्नपूर्णे देवी जयजय जगदंबे जननीं ।तुज ऎसी देवता नाही कोणी त्रिभूवनी ॥ धृ. ॥विप्र धनंजय त्याची भार्या सुलक्षण होती ।ती दोघेही अनन्यभावे तव भक्ति करिती ॥तुझ्य़ा प्रसादे झाली त्यांना पुत्राची प्राप्ती ॥सुखशांती लाभली देवी ऎशी तव कीर्ती ॥ १ ॥नरदेहाचें सार्थक होते तव पूजन करुनी ।नामस्मरणे सकलही जाती भवसागर तरुनी ॥जीवन जरि हें भरले आहे व्याधि - उपाधींनीं ।प्रसन्न परि तू होता सारे भय जाते पळूनी ॥ २ ॥छंद मनाला तुझा लागला मी करितो धांवा ।धावुनी ये देंवते पाहुनी मम भक्तीभावा ॥अखंड शाश्वत प्रेमसुखाचा दे मजला ठेवा ॥जन्ममृत्यूचा फेरा चुकवी ठाव पदी द्यावा ॥ ३ ॥तूं माझी माऊली जाण मी बालक तव तान्हा ।क्षमस्व माते अपराधांची करूं गणना ॥अन्नवस्त्र दे वैभव सारे सुखभोगहि नाना ।मिलिंदमाधव करी प्रार्थना वंदुनी तव चरणां ॥ ४ ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP