मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
संत गोरा कुंभार आरती

संत गोरा कुंभार आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.




संत गोरा कुंभार आरती
 
सत्तावीस युगे सत्यपूर नगरी ।
न वर्णवे त्या हरी हरा थोरी ।
अखंड ध्यातो पूजा विस्तारी ।
शुक सनकादीक जय जय हाकारी ।
जय देव जय देव जय गोरोबा ।
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा ।
जय देव जय देव … ॥धृ ॥
 
धन्य कवित्व अनुपम्य केले 1
ऐकता जीव शिव संतुष्ट झाले ।
पाहता पाऊल विश्व मावळले ।
अनुभव घेता सद्गुरू भेटले ।
जय देव जय देव जय गोरोबा ।
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा ।
जय देव जय देव … ॥१॥
 
दूरपण उघडे तुजपाशी केले ।
अनुभव घेता तापसी झाले ।
म्हणुनी नामा ओवाळी भावे ।
त्यापाशी देव कैवल्य साचे ।
जय देव जय देव जय गोरोबा ।
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा ।
जय देव जय देव … ॥२॥
===================================
संत गोरा कुंभार अभंग
आरती २
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव ॥१॥
धन्य कवित्व अनुपम्य केले ।
ऐकता जीव शिव संतुष्ट झाले ॥
पाहता पाऊले विश्व मावळले ॥
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव ॥२॥
दूरपण उघडे तुजपाशी केले ।
अनुभव घेता तापसी झाले ॥
म्हणुनी नामा ओवाळू भावे ।
त्या पाशी देव कैवल्यसाचे ॥
जय देव जय देव जय गोरोबा
आरती ओवाळू तुमच्या स्वरूपा जय देव जय देव ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 12, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP