मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|विविध आरती संग्रह|
मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।
प्रसन्न होऊनिया वर देई आता ॥धृ.॥
 
विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता ।
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ॥१॥
 
विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही ।
धावसी आम्हालाही पावसी लवलाही ॥२॥
 
त्र्यैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती ।
सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती ॥३॥
 
वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे ।
देसि दान बरदे सदैव सौख्याचे ॥४॥
 
यास्तव अगस्ती बंधु आरती ओवाळी ।
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ॥५॥
 
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।
प्रसन्न होऊनिया वर देई आता……

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP