रामचंद्राचीं आरती
देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.
जय जय श्रीरामचंद्रा भक्तवत्सला ॥
पंचारति करितो तुज दावी पाउला ॥ धृ. ॥
अयोध्यपुर दट्टण शरयूच्या तीरी ॥
अवतरसि रवि कुळी कौसल्येमंदिरीं ॥
नगरांतील नारि सकल येति झडकरी ॥
ओंवाळीति प्रेमभरे आरती तुला ॥ जय. ॥१॥
सुरवर मग पुष्पवृष्टी करुनि डोलती ॥
अप्सरादि गान अति मधुर बोलती ॥
दुष्ट दैत्य धाके बहु चित्ति पोळती ॥
त्रिभुवनांत भक्तजनां हर्ष जाहला ॥जय जय. ॥२॥
पितृवचन मानुनियां विचरसी वनी ॥
दशशिर कपटे हरि जनकनंदिनी ॥
वानरदल अतितुंबळ निघसि येउनि ॥
सागरांत नामबळे सेतु बांधिला ॥ जय जय. ॥३॥
रावणादि दुष्ट दैत्य वधिसी त्यांजला ॥
विबुध मुक्त करुनि भरत राज्यिं स्थापिला ॥
जानकीसह निजगजरे येसि निजस्थळा ॥
अभयवरे विठ्ठलसुत रक्षिं आपुला ॥जय जय. ॥४॥
==
रामाची आरती
नाना देही देव एक विराजे।
नाना नाटकलीला सुंदर रूप साजे।
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे ॥१॥
जयदेव जयदेव आत्मया रामा ।
निगमागम शोधीता न कळे गुणसीमा ॥ध्रु.
बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा।
हरि-हर-ब्रह्मादिक देव सकळांचा।
युगानुयुगी आत्माराम आमुचा।
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥२॥
जयदेव जयदेव आत्मया रामा ।
निगमागम शोधीता न कळे गुणसीमा ॥ध्रु.
******
स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली ।
शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली ।
तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली ।
जय देव जय देव निजबोधा रामा ॥१॥
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ॥धृ०॥
उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ॥२॥
प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ॥३॥
निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ॥४॥
अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ॥५॥
सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ॥६॥
******
उत्कट साधूनि शिळा सेतू बांधोनि
लिंगदेह लंकापूर विध्वंसोनि
कामक्रोधादिक राक्षस मर्दुनि
देह-अहंभाव रावण निवटोनि
जय देव जय देव निजबोधा रामा
परमात्मे आरती, सद्भावे आरती, परिपूर्ण कामा ॥धृ.॥
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला
लंकादहन करूनि अखयां मारिला
मारिला जमुमाळी भुवनी त्राटिला
आनंदाची गुढी घेऊनियां आला ॥१॥
निजबळें निजशक्ति सोडविली सीता
म्हणूनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा
आनंदें ओसंडे वैराग्य भरता
आरती घेऊन आली कौसल्यामाता ॥२॥
अनाहतध्वनी गर्जती अपार
अठरा पद्में वानर करिती भुभुःकार
अयोध्येसी आले दशरथकुमार
नगरीं होत आहे आनंद थोर ॥३॥
सहज सिंहासनीं राजा रघुवीर
सोहंभावे तया पूजा उपचार
सहजांची आरती वाद्यांचा गजर
माधवदासा स्वामी आठव न विसर
जय देव जय देव निजबोधा रामा
परमात्मे आरती, सद्भावे आरती, परिपूर्ण कामा ॥४॥
******
जयजयाजी रामराया करि कृपेची छाया ।
पंचारति ओवाळुनि करूं कुरवंडी पाया ॥धृ॥
ब्रह्मयाच्या वरदानें दैत्य रावणकुंभकर्ण ।
अजिंक होवुनिया देव पीडिले संपूर्ण ।
दितिकुळ तृप्त जालें भक्षुनिया ऋषिगण ॥१॥
भूभार हारावया रघुकुळीं अवतार ।
कौसल्येचे ठाईं जालें परब्रह्म साकार ।
दाशरथि रामचंद्र मूर्तिं सावळि सुंदर ।
देव पुष्पवृष्टि करिति अयोध्येसि जयजयकार ॥२॥
शेष सेवा करावया जाला बंधु लक्षुमण ।
ताटिकेसी मारियलें केलें मखाचें रक्षण ।
शिवचाप भंगोनिया वरिली सीता सुलक्षण ।
भार्गवाचा गर्व हरिला येतां अयुध्येलागुन ॥३॥
पितृआज्ञे वनवास देवकार्यार्थ केला ।
सुग्रिवादि वानरांचा समुदाय मेळविला ।
पाण्यावरि दगडाचा दृढसेतु बांधिला ।
रावणातें दंडुनिया सीताशोक निवारिला ॥४॥
पुष्पकविमानांत सीतारामलक्षुमण ।
नळनीळ जांबुवंत सुग्रिव भक्त हनुमान ।
अयोध्येसि येते जाले भरतासि संबोखुन ।
रघुराज गुरुपायीं ठेवि मस्तक निरंजन ॥५॥
******
सुजानकि राघवेंद्रजीची ॥ धृ. ॥
ध्वजांकुश शंख पद्मचरणा ।
कांति ती लाजविती अरुणा ॥
नखमणिभाति मग्नशरणा । फलद उषशमा जन्ममरणा ॥ चाल ॥
तोडर गुल्फ गजरशाली ।
ग्रथित दशवदन, प्रभुति धृती कदन, विजित सुरसदन, भ्रमसुर कीर्ति वंदनाची ।
निरांजनी कीर्ति वंदनाची ॥ आरती. ॥१॥
तडित्प्रभ पीतवसन जघनी ।
जडित कटि रत्नसुत्र वसनी ॥
जनकजा अंकित शिवजघनीं ।
शिरद्रमि मृगांकवदनी ॥चाल ॥
सुसर हे मुक्तहार कंठी ।
सरळ करि धनुष येष धरि मनुष,
सत्वरी कलुषहरण उटि तनुसि चंदनाची ॥
उटि तनुसि मलयचंदनाची ॥ आरती. ॥२॥
त्रिवली राजित रुइसुम गळां ।
नाभिह्र्द लाजविती इंगळा ॥
उत्तरी यज्ञोपवित गळां ।
वक्षस्थलिं भृदगपदांग सकला ॥ चाल ॥
एकावली दिव्य खङगकोशी ।
विष्टिशत विशांग, शिरपर पिशांग, पक्षजी विशांग, घटितमणी कंकणां गदाती ॥
दिप्तीवर कंकणांगदाची ॥ आरती. ॥३॥
आनन पुर्णेदु वमन मलिनें ।
कृपार्द्रांकरण नयन मलिनें ।
स्मिताधर रदनरवेवलिनें पाहतां धृतृजन्म मलिनें॥ चाल ॥
मृगमदातिलक उंचभाळी ।
धनुषकोटी; रभिरव कोटी, रगरवकोटी, रविद्युतितरळ कुंडलाची ॥
गुंतली स्फूर्ति कुंडलाची ॥ आरती. ॥४॥
सदसि पुष्पकासना वरती ।
शिरद्रूमि छत्र लसद मूर्ती ॥
सुशोभित सहोदरा वरती ।
भक्तजन पूर्ण करिती आर्ती ॥ चाल ॥
तुंबर गान किन्नरादी ।
अप्सरा छनन, नयन कृत अनन, तनन स्वर घनन, गर्जे ध्वनी बंदि जल्पनाची ॥
मधुर ध्वनी बंदि जल्पनाची ॥ आरती. ॥५॥
******
आरती रामाची - जयदेव जयदेव जयजय श्रीरामा
=
जयदेव जयदेव जयजय श्रीरामा । आरती ओवाळूं तुज मेघश्यामा ॥धृ॥
लीला दाउनि अगणित आले पंचवटीं । वसते झाले येउनि गंगातिरनिकटीं । सीता लक्षूमण रघुविर धोर्जटी । चवदा वर्षें केल्या तपाच्या कोटी जयदेव ॥१॥
दंडुनिया रजनीचर कांता सोडविली । तेहतिसकोटि देवाची सुटका केली ॥ जयदेव ॥२॥
आडवि जाउनि अवघी ऋषीमंडळी । श्रीरामासि अणिलें गोदातिर जवळी । वामांकावरि सीता शोभे ते काळीं । नीरंजन आरति घेउनि ओवाळी ॥ जयदेव ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 18, 2026

TOP