श्री संत बाळूमामा आरती

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.


जयदेव जयदेव जय बाळूमामा ।
आरती ओवाळू तुज कैवल्य धामा ॥धृ॥
 
धनगर कुलाचा उद्धार झाला ।
अवतरले संत अकोळ गावाला ।
बालपणी त्यानी चमत्कार केला ।
वस्तीचे दर्शन भोजन थाळीला ॥१॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
 
मेंढ्या राखिती उन्हातानात ।
मुक्या प्राण्यावर अपार प्रीत ।
नीतीने वागावे कमी नाही होत ।
उन्मत्ताला मामा शासन करीत ॥२॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
 
गोसावी रूपात देवदूत आले ।
मामांचे त्यांनी सत्व पाहिले ।
अवघड विहिरीचे पाणी पाजता ।
आशीर्वाद देवी प्रसन्न होता ॥३॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
 
दीन दुबळ्यांना मामा राक्षिती ।
निपुत्रिकाला मामा संतान देती ।
कण्या रोगाल्या औषधी होती ।
भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती ॥४॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
 
पृथ्वीतलावर मामांची सत्ता ।
देती वचन आपुल्या भक्ता ।
आदमापूर क्षेत्री समाधी घेता ।
स्वप्नी दर्शन भक्तांना देता ॥५॥
जयदेव जयदेव जय बाळूमामा...
 
॥ बोला संत बाळूमामा महाराज की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP