शिवचरित्र - लेख ८०
छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक
[वा.फा.शि.]
श.१६१३ मार्गशिर्ष शु.१०
इ.१६९१ नोव्हेंबर २०
ई कौलनामा [व] जारतीपन्हा दिवाण व अमीन व फउजदार सरकार तलकोकण ताहा दामाजी आपाजी देसाई व देसपाडिये मामले मुर्तजाबाद उरुफ चेउल सन ३५ सु॥ इसने तिसैन व अलफ तुझे बाबे येकबालपन्हा सिदी अजम सिदी अबदुल रहिमान किलेदार किले उदेरी येही लिहिले की देसपाडिया सक धरुन राहिला आहे त्यासि तकवेत कौउल सादर केला पाहिजे म्हणून लिहिले तर तुवा बेसक होऊन येणे आपला कारभार करीत जाणे तुझा हकलाजिमा असेल कदीम तो तू हुजूर रुजु जालेयावर तुज घेवयांचा हुकूम देऊन कोण्हे बाबे सक अधेसा न धरणे दरी बाब कौलु असे छ ९ रबिलौवल
N/A
References : N/A
Last Updated : February 27, 2019
TOP