मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख २०

शिवचरित्र - लेख २०

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


तालिक
श. १५२० माघ शु. १४
इ. १६०७ जाने. ३१

अजरख्तखाने खास बजानेब सरसमत व कारकुनानी हाल व [इस्तकबाल] देशाई व अदकारी यांनी मामले मुर्तजाबाद उर्फ [चेऊल] ........ सु॥ सबा अलफ कोली दादर व कोली चुनाडी बी तपसील
नागोजी पाटेल
दरवेस पाटेले
हापसी पाटेले

कसबे चेऊल मामले मजकूर हुजूर येऊन बदगी हजरत आपला अहवल मकसूद मालिम केला तेणेप्रमाणे हुजरुन खातरेस आणौ (नु) सरंजाम केला असे बीतपसील.

आपणासी बेगार माफ करोन वेठबेगार बदल किरे सिरभारी मसूल सालाबाज घेत आहेती आणि मक्तेयाचे पैके घेऊन बेगारीचे तश्वीस देतांत ऐसी दुबार तसवीस लागते ये तसविसे करितां जरीब खराबा जाहाला आहे कितीयेक कुले रेवदंडा व जागां जागां गेलिया आहेत यावर फिरंगियांची फतरत जाहाली आपली घरे जालिलीं व बंदे नेली येणेकरिता जरीब मुतलक खराब जाहाला आपणासी किरे सीरभारी हाली दीधली न वजे तरी साहेबी मामुरीवर नजर देऊन कीर सिरभारी आपणास माफ करणे वेट बेगारी सालाबाज चालवितो तेणेप्रमाणे चालवीत जाऊ म्हणोन तरी जाब सरंजाम यासी बैगारी माफ करोन बदल वेठ बेगारी कीर सिरभारीचा मकर्ता सालाबाज घेतांत तेणेप्रमाणें घेत जाणे हरयेक वेठ बेगार माफ केली असे तश्वीस लागो न देणे १.
रहीसाची वनगी सालाबाज आपणावर नाही हाली गैरकानु तसवीस देऊन रईस वनगी घेतो तरी रहीसासी वनगी घेऊ न देणे म्हणोन तरी जाब सरंजाम सालाबाज जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे चालवीत जाइजे नवी जिकीर न करणे १ कौली आपणामध्ये आपण [झ] गडा भाडण करितांत त्यासी ताजीलनाल माफ करणे म्हणोन तरी जाब सरंजाम साला चालिले असले तेणेप्रमाणे चालवणे १
निपुत्रिक व सिनलक व वरटटका व बोखारटका सालाबाज महद कदम आपणासी माप आहे तेणेप्रमाणे चालवणे म्हणोन तरी जाब सरंजाम सालाबाज जैसे जालिले असेल तेणेप्रमाणे चालवीजे १ आपण सालाबाज तपे अस्टागरीची कोली खुटे दरियांमधे खाऊन आणि सिरजोरी करोन खातात आणि आपणास काही देत नांही ती आपली खुटे तपे अष्टगरकास ताकीद करुन आपले टुमाला करणे अगर दरखुटास लाहारी ५ देववणे जो खुट खाईल तो देत जाईल म्हणोन तरी जाब सरंजाम सालाबाज अष्टागरीचे कोली खुटे रोऊन कमाविस केली नसेल हाली नवी जिकर करोन खुटे रोऊन कमाविस करीत असतील ते खुटे सालाबाज प्रमाणे यांचे टुमाला कीजे अगर जो खुट खाईल त्या करवी महसूल देविजे-१
चेऊलच्या लोकास ईदपटी कालै आहे जैसे सालाबाज उगवणी करणे तरी तेच बरनिसबत आपणास पाठऊन उगवणी करणेव
म्हणोन तरी जाब सरंजाम बरहुकूम केले येकंदर चेऊलप्रमाणे कमावीस करणे १

[सदर] हूप्रमाणे कमावीस व पालणुक कीजे ताली ..... फिरावेन दीजे रवना छ १२ सवल

N/A

References : N/A
Last Updated : February 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP