मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख १२

शिवचरित्र - लेख १२

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


श. १५१० माघ शु. ६
इ.१५८९ जाने. १२

अज दीवाण र॥ खास बजानेब सरसंमत व कारकुनानी व देसमुखानी मामले मुर्तजाबाद उरुफ चेऊल बिदानद सु॥ तिसा समाननि व तिसा मैया वर्तक वाडिवल आगर चेऊल हुजूर येउनु बदर्गी हजरती मालुम केले खातीरेसी आणौनु सरजाम फर्माविला असे

आगर मजकुरीचे माहामुलाची उगवणी पेसजी बुटुरुखी खुर्दा उगवणी होत असे दूरीवख्त हजरती दिवाणे फिरगियावरी स्वारी फर्माविली तैपासुन दूर ळारिस टके १/९ प्रमाणे उगवणी होत असे दरीवख्त हर निसबती भिउडी दर ळारिस टके १०१ मजुरा देउनु वरताला काढून हुजुरुन वराता कीरताती ये तसविसेकरिता प्रजा परागदा होउनु आगर खराब जाला फिरगियाचे तसविसेकरिता झाडमाड फोफली आंबा फणस तुटले हक म‍र्‍हामती फर्माउनु दर लारी टके १/९ प्रमाणे मजुरा देणे व सन समाना (कारणे) वरताला काढिला आहे तो दुरी करणे म्हणौनु तरी अगर मजकुरीचा माहासूल दूर लारीस टके १/९ प्रमाणे मजुरा (देत) जाईजे व सन समाना कारणे हर निसबती भिउडी दर लारी १०३ प्रमाणें मजुरा देऊनु वरताला काढिला आहे तो दुरी केला असे तसवीस न दीजे साल मजकुरापासुनु दर लारीस १/९ प्रमाणे मजुरा देत जाइजे झाडे वारेयान पडताती व मरोन जाताती त्याचा महसूल प्रजापासुनु घेताती व दाहा सालां प्रभावली करुन माहासूल घेणे यैसी गहदम कानु आहे हाली कारकून हरवख्त प्रभावली करुन तसवीस देताती म्हणौनु तरी दाह्यसाला प्रभावली करणे म्हणौनु गहदम कानु आहे तेणेच प्रमाणे दाहा साला प्रभावली करीत जाइजे व झाडे वारेयाने पडत असतील व मरत असतील ते मजुरा दीजे ज्यादती रयेतीस तसवीस ने दीजे आगरीचा माहासूल व पटिया बारमा ह्य उगवणी करिताती तेणेप्रमाणे उगवणी करणे म्हणौनु तरी बारमाहा उगवणी जैसी होत आहे तेणेच प्रमाणे बारमाहा उगवणी करीत जाइजे कुंभार माहालीचे कारकुनाचे तसविसे करिता गयाल जाले आहेती आगरामधे गाडगे पाहिजताती तरी त्याची तसवीस दुरी जालेया आगरासी येतील म्हणौनु तरी कुभारासी कौल देऊनु आणिजे तसवीस ने दीजे

प्रजा लोक आपलाले आगरीहुन व आठागरीहून केले व काकडे व आंबे व फणस चिचा आणौनु आगरामधे विकिताती त्यासि सालाबाद गहदम सारापटी नाही हाली यासि देसक सारापटी घाळिताती ये बाबे फर्मान अमल कीजे पाखाडी उसवी व कोपरी व बाजे पाखाडि यामधे वाडिया हिमायेतीदारांच्या आहेती ते सारापटिया देत नाही आणि तो सारा पटिया आपणावरी पडतो तरी ज्यासी ब॥ फर्मान अमल कीजे पाखाडी उसवी व कोपरी व बाजे पाखाडि यामधे वाडिया हिमायेतीदारांच्या आहेती ते सारापटिया देत नाही आणि तो सारा पटिया आपणावरी पडतो तरी ज्यासी ब॥ फर्मान सारापटिया दिधल्या असतील त्या मजुरा देणे ज्यास दिधले असतील त्या मजुरा देणे ज्यास दिधले नसेल तरी त्यासी तहसील करणे म्हणौनु तरी ज्यासी सारापटिया ब॥ फर्मान बसीके खास दिधलीया असतील त्या मजुरां दीजे ज्यास दीधले नसेल ते त्याजपासी तहसील कीजे रयेतीस तसवीस ने दीजे वेटी बेगारी करितां आगराची नाकीर्दी जाली आहे तरी वेठी बेगारीची तसवीस माफ करणे व आगरीहून भाजीपाला व केले आंबे बाजारमधे विकावया नेतो त्यासी वानगी म्हणौनु हर कोण्ही तसवीस देउनु ळुटिताती म्हणौनु तरी आगर मजकुरीचे प्रजांसी वेठी बेगारीची तसवीस ने दीजे व सबजी व केले व आंबे विकितील त्यासी वानगी ने वीजे तसवीस न दीजे. वर्‍हाडटका कुणबियापासुनु दोघासमधियापासुनु टका येक माहाल चाली कानु आहे दरीवरुन ज्यादती तसवीस देताती म्हणौनु तरी वर्‍हाडटका दोघा समधियापासुनु टका ये महालचाली कानु आहे तेणेप्रमाणे घेत जाईजे ज्याजती तसवीस ने दीजे

येणेप्रमाणें अमल कीजे रयेतीस कौल दिलदारी देउनु आगर कीर्दी सामुरी कीजे तालिक घेउनु असल नफर मजकुरांपासी असो दीजे
तेरीख ५ माहे रबिलौवल

N/A

References : N/A
Last Updated : February 11, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP