मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ६३

शिवचरित्र - लेख ६३

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


N/A[वा.म.शि.]
श.१६०७ चैत्र शु.१२
इ.१६८५ एप्रिल ६

र्द कौलनामा अजसुभा राजश्री हरी सिवदेव सुबेदार व कारकून सुभा महालानिहाये त....चेऊल सु॥ सन खमस समानैन अलफु दादे कौलनामा यैसाजे तुमचे बाबे देसक मामले मजकूर सुभा येऊन मालुम केले यैसे जे मामले मजकुरीं रयेतीवरी कितेक बाबे जलल जालें आहे रयेतीमधें कांही उबार राहिला नाही बेमवसर जाली आहे गावांत राहावयासि रयेतीमधे तकवा नाहीं म्हणौनु मामले मजकुरीची रयेती कुल अवघी जमा होऊन हुजूर आपले पारपत्याकारणे जात आहे तरी अजी मृगास महिना दीड महिना राहिला ये हंगामी रयेती हुजूर गेली म्हणीजे हुजूर पारपत्याकारणे थोडा तर्‍ही येक महिना पाहिजे तेथें महिनाभरी रयेती गुतोन राहिली म्हणीजे मागे ........ बुडाली तेणें करुन कीर्दीस धका ................. रयेतीचा मुदा मनास आणून ..........दिलासा करुन पारमत्य केले पाहिजे ...... ऊन आणून कीर्दीस लाविली पाहिजे म्हणौनु विदित केले त्यावरुन तुमचा मुदा मनास आणावयाकारणें देसक मजकूर तुम्हाकडे पाठविले त्याबराबरी तुम्ही मुदा लेहोन पाठविला त्या मुदाप्रमाणें तुम्हांस कौल सादर केला असे बीतपसील
किता कलम बागाईत नारेल व सुपारीचें दस्त सन अर्बामधें वाडीची वाडी बागाचा बाग पाहाणी करुन दस्त आकारिलें असोन हालीं सालमारी राजश्री चिमणाजी अउजी मामले मजकुरीं आले त्यानी आर्बाचें पाहाणीस जें झाडें हाजर होती त्यां झाडांचे माथा सन इसनेंचे पाहाणीमुलें सरासरी दर झाडास बेरीज बैसली तेणेंप्रमाणे आर्बाची पाहाणीस हाजर झाडें होती त्या हिसेंबें दस्त आकारून आर्बामधें जमा केली त्यापैकी आर्बात जाला वसूल पाहणीमुले तो वजा देऊन उरली ते बाकी काढिली साल मारीही आर्बामधे इसने रुजु घालून जमा आकारिली तेणेंच प्रमाणें जमा धरिली तरी आर्बात पाहाणी केली ते काये सबब दूर करुन इसनेंचे पाहाणीमुले जमा धरुन दुसाला बाकी काढिली तरी ते इसनेचें पाहाणीमुलें अपलियाच्याने देवत नाही आर्बाचेंच पहाणीमुलें घेतलें पाहिजे आर्बाचे पाहाणी गुजाईस आहे म्हणौनु साहेबास वाटत असेल तरी साल मारी नवी पाहाणी ..... पाहा ...... करुन तेणेंप्रमाणे बागाईत अकारेल तेणेंच प्रमाणे घेऊन जाजती तसवीस लागणार नाही कलम १ येक कलम रास.
किता कलम जिरायेताचे तसैराचा तह राजश्री केशोपंत येऊन तह केला कीं दर खंडीस लारी बसरी ४० प्रमाणें नख्त घेणें म्हणौनु मुलकामधें जागां जागां दिवाण निरख दरखंडीस च्यालिस लारी प्रा। निरख करुन दिधला असतां हाली यैलीकडे सालापासून दर खंडीस लारी ४५ पंचेतालीस प्रमाणें वसूल घेतला अहे तो पेस्तर साली मजुरा दिधला पाहिजे आणि पेस्तर सालीं ४० प्रमाणें तसैराचा बाब घेतला पाहिजे म्हणोनु तरी बाजे माहालैप्रमाणें घेऊन बाजें माहालाखेरीज ज्याजती घेणार नाही कलम १
येक कलम रास. किता कलम राजभागाचा गला हगामसीर किलेकोटास व सनदेवाइकास यैवज देता त्यासि गड किलेयासि भात न्यावें यासि मबलगा नुकसान बैसतें सवाईनें भरती होत नाही तरी हगामसीर गला येवज किले कोटांस देववाल त्यासि आपला हरकारा देऊन रास्ती माप घेवविले पाहिजें ज्याजती नुकसानाची तोसीस न लागे ते केले पाहिजे म्हणौनु तरी गड किलेयासि येवज गला [जाईल त्याचें] मापाकरणें-दिवाणचा हरकारा ..... देऊन रास्ती मापे घेत ते करुन कलम १ येक कलम रास.
येणेंप्रमाणें तुम्हास कौल सादर केला असे कौलप्रमाणे कवीहाल होऊन सुखें आपले जागा जागा कीर्दीस कस्ट मशागतां करणें कोणें बाबे शक न धरणें दरी बाब कौल असे [नि.] मोर्तब खुद [‘मोर्तब सुद’ असा वा.मो.]
[कागदामागें] तेरीख ११ ,माहे जमादिलौवल.
जमादिलौवल

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP