TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|ऐतिहासिक साहित्य|शिवचरित्रसाहित्य|
लेख ३

शिवचरित्र - लेख ३

छत्रपति शिवाजी महाराज एक भारतीय शासक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.


शिवचरित्र - लेख ३
॥श्री॥

नकल श. १४८६ इ. १५६४
महजरनामा हाजिर मजालिस देशमुखान व शेटे माहाजनानि व चौधरियानी व मोक्तासरानि मामले मुर्तजाबाद उर्फ चेऊल दर जागा हवेलि जिवन पारशि सुहूर सन खमस सितैन व तिसां मयां
रामाजिपंत  देसाई १
तावजि नार प्रभु सबनिस १
गोविंदराम प्रभु यादव कासार बेकर १
मोहन भारण जोव्हेरि १
कृष्णभट शिधोरें
श्रिधरभट्ट खाडिलकर १
जिवन बखारदार १
लालदेवराज हंसराज १
देवा दलवि
तिमाजि विठल माहाजन चाटे
विनायक सराफ
अनंतभट्ट दिक्षीत
सुडक ठाकूर आधिकारि
गोविंद चौधरि १
दिपाजी सेटया बोगार १
रामाजी सुदरशेण सराप
मदसुदनभट्ट
विठ्ठल करपे
रामेशभट्ट देव
नारायण भवान शेठिया
कल्याण माहादेव जरकर
राघव सुरा कातारि
अंताजि खत्रि
मुकादम
वैजनाथभट्ट पराडकर
हरिपंत अतरकर
गोरा मंगळ चोघला
राजगवळि

तावजि नागोजि देशाई व देशकुळकर्णि, विठोजि गंबाजी उमारे, रामसेणवि मेडें, नथु मुकादम, कमाजि सेठि नाईकर, कृष्णाजि नाईक कळबे, भानुभट्ट दबके, चंदशेखरभट्ट जळशे,पदमशेठि सोनार, आपाजी बोगार, नामाजि कोतवाल, मदन सोरज, अरमाळ सोरग, देवजी जयराम त्रवाडि. सदरहु हजिर मजालसिस उपाध्ये येहि विदित केले कि आपलि व जोसि याची वृत्ति माहालनिहाय बितपसील

माहाल आगर चेऊल पाखाड्या
१  प्रथम
१  बेळह्यावि
१  पेठ
१  आभेपुरि
१  भोरशि
१  मोखव
१  वैजाळी
१  तुडाळ
१  झिराळे
१  उसवि
१  कोपरि

माहाल कसबा व पेठ हुसेनाबाद व नवें नगर
१  देखोल डाभे करबेळि तपे
१  ब्राह्मणगाव कसनदिचा कक्षण भाग नउदर बागमळा
१  तपे उमटे
१  तपे माडळे मौजे माहन तपे पाल १

तालुके फीरगी खेदंडे पाखाड्या
१  दाडे
१  मुरुडपालव
१  दाखवड
सदरहु जागेयाचा उपभोग उपाध्ये व जोसि हर्टु जणाचा यामध्यें जोसि यांची नवि कानू केलि म्हणून उपाध्ये यांचि व जोसि यांची कटकट लागलि या करितां उपाध्ये येहि जोसि यास मजालसिमध्यें घेऊन आले याची नावनिसी तपसिल

जोशि
महादेव जोशि बेळहावकर १
भिक जोशी आगरकर
उपाध्यें
रामेशभट् प्रथम १
सुडकभट्ट द्वितीय १
नागनाथ भट्ट त्रीतिय १
बापाजीभट्ट तईत्रव १
समस्त उपाध्ये ४

जोशि व उपाध्ये यांची मनसुबि मनास आणितां पुरातन चालत आले आहे त्यामौजिब उपाध्ये भोगवटा करित आहेत व जोशि पुरातन दडाड होता त्याची घराणि तिन होति त्याचें संतान अलफ होत आलें जे कोण्ही होते तें मुर्ख होते तें विद्यावान कोण्ही नाहि याजकरिता आगरकर व बेळ्हावकर या दोघांचे मुळ पुरुष बेळ्हावकर याचा तळ्याहुन आला व आगरकर याचा दिव्याहुन आल आपले वृतिचे काम चालवावयास ठेविले होते कितेक वरषें लग्न मुहुर्त चालउन परिपाट पडिला विद्यावान म्हणुन दिवाण दरबारि व देशमुखाकडें प्रतिष्ठित ग्रहस्ताकडे आर्जव बहुत जाहले याजकरितां सबळ होउन दडाड याचे वृतिचा लोप करु लागले त्यांचे वंशि तिघे पुरुष होते त्याधी नावे गणेश वरतक १ माहाद वरतक १ पिल वरतक १ असे तिघे जण दडाड जोसि यांचे वंशिं होते या तिघामध्ये पिल वरतक बहुत पराक्रमि जाहाला त्याण्हें दिवाण दरबारि कटकट आणुन आपलि वृत्त आपले हातास येऊन हरदुजण टुर करावें ऐसे ईलाजास लागला ते वख्ती आगरकर व बेळ्हावकर यांहि दिवाणामध्यें चाहाडि सांगितलि ऐसि जें पिल वर्तक याचे भावानें दडाड खाचरि सेत मिळकतिचें सेत ते सेत फिरगियासि दिधले त्यावर शेताचि कमाविस करावयास फिरंगी आला ते हकिकत दिवाणामध्ये हरदुजणानें सागितलि कि फिरंगियास मिळकत न द्यावि ऐसा तह जाहाला असता याचे भावाने दिवाणाचे बगर रजेनें विकलि ऐसे सांगतां दडाडास कैद करुन दिवाणांत आणिला गुन्हा ताहाकिकत करुन कोरे कागदावर तिन स्कें करुन सुळि द्यावयास पाठविला ते समई बहुताने अर्ज केला परंतु अर्ज कोण्हाचा मजुरा जाहाला नाहि ते वखतिं पिल वर्तकानें अर्ज केलेला जे सेतासाठि सुळि देता ते सेतात नेउन सुळि देणे त्यावरुन त्या दडाड खाचरां नेउन सुळि दिधला त्यावर हरदुजण वृतिमध्यें बहुतच कानु करु लागलें पुरातन कानु दडाडाचे वख्ती होति ति व हालि करु लागलें वितपसिल
लग्नपत्रिकेस बुजरुख बुजरुखी बारा सण्या होत्या हालि चोविस मागतात २४
घटिका घालते समई च्यार सण्या होत्या हालि आठ मागतात ८
मुंजीचि पाठवणि दिड लाहारि हालि दोन मागतात २
फळप्रदानि गणेश पुजनि बुज ठसण्या ८ हालि १६
पाटास गणेश पुजनि बुज ४ हालि ८
मंडप प्रतिष्ठेस व गणेशपुजनि बुजरुख च्यार होते हालि आठ भागतात ८
लग्न अक्षता समई उभय वर्गापासून बुजुरुखि आठ होति हालि सोळा मागतात १६
नावरसिस बुज रु. २४ हालि ३२
लग्नाची पाठवणि बसरि लाहारि २ हालि दोन २
पाटाचि पाठवणि बसरि १ हालि २

याजप्रमाणें दडाडाचा भोगवटा चालत होत आला आतां या रवेसिने मागतात आणि दडाडाचा उछेद करुन आपलि वृत्ति ऐसि मिरउ लागलें हि सर्व हकीकत हाजीर मजालशिस जाहिर जाहालि ते वख्ती हरदु जणास ताकिद करुन साधीतले कि दडाड ज्याप्रमाणें घेत होता त्याप्रमाणें तुम्ही घेणें जास्ती उपद्रव करुन आपला बोभाट कधी आला तर वृत्तिपासुन दुर व्हाल आणि दिव्हाणांत गुन्हेगारि ऐसें समजोन वर्तणुक करित जाणें
शके १४८६

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-02-11T18:30:03.6870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

sentient

  • ंसंज्ञाशील 
RANDOM WORD

Did you know?

विवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.