दासोपंत चरित्र - पदे ३०१ ते ३२५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


जरी ह्मणावे ते मातापिता । त्यांची संरक्षण करावी आता । तरी परत्र पावले असतां त्यांचे मातापिता । तेव्हा त्यांस कोण रक्षिले ॥१॥ हे संपूर्ण जगी जनार्दन । तोंच तोकी परिपूर्ण । कोण कोणाचे पालन । पोषणकर्ता कोण असे ॥२॥ जो जो प्राणी जन्मास येतो । त्याचे कर्मानुसार योग घडती । तो भोगल्याविना सुटकेसि मुकतो । यापरि प्रवाहो जन्ममृत्यु ॥३॥ हा प्रत्यक्ष दिसतो हुताश । कां उडी घालावी डोळसं । यास करिता निरास । सुखासि त्याजला काय उणे ॥४॥ सुखप्राप्तीचे जे द्वार । प्रत्यक्षच हा नरशरीर । त्या सुखासि टाकूनि निरंतर । चिंता वाहे देहगेह ॥५॥ आतां नको नको हे चिंता । कै पावेन श्रीअवधूता । त्याचे प्राप्तीची तत्वता । चिंता आता करावी ॥६॥ ज्यामध्ये दिगंबरभेट घडे । त्याचे पदी मस्तकपात घडे । करीन मी अति तांतडे । हा उपावो करावा ॥७॥ यापरी विचार करुन मनांत । काय करीते झाले दासोपंत । जो महाराज मूर्तिमंत । अवतारपुरुष भूतळी ॥८॥ जरी हें सांगता मातापिता । निरोप न देतात की मज आता । यांचे संगती राहता । मज अवधूत केवि भेटे ॥९॥ यापरी योजना करुनि मनी । काय करिते झाले भक्तशिरोमणि । हे ऐकावें संतसज्जनी । कृपाकरुन दीनावरी ॥१०॥ वडीलवडिलांचे मुखोद्गत । श्रवण केले होते ते समर्थ । मातापुरी सह्याद्रिपर्वत । तेथे वसे दिगंबर ॥११॥ तेथे गोलियावांचून । मज न भेटे अत्रीनंदन । शीघ्र जावें निघून । कोणास न सांगता या काळी ॥१२॥ यापरी योजून अंत:करणी । लक्ष्य देऊनि दिगंबरचरणी । निघते झाले भक्तचूडामणी । दासोपंत महाराज ॥१३॥ घर सोडून पुढे ठेवतां पाउले । पाउलापाउली दत्तच भरले । दश दिशा दत्त कोंदाटले । दत्तच दिसे चराचरी ॥१४॥ वृत्ति रंगता दत्तापायी । दत्तच दिसे बाह्यांतर ह्रदयी । कोण मी ? कोठे जातो ? या समयी । हे भान कांही नसेचि ॥१५॥ दत्तमय होऊन आपण । पुढे जातसे हर्षाय - मान । ज्यावरी कृपा अनसूयानंदन । त्याचे भाग्य कोण वर्णी ? ॥१६॥ त्यांनी जेथे जेथे उभा राहे । तेथे तेथेंच ते उभा ठाये । त्याचे मनोरथ दत्तात्रेय । सहज पुरविती स्वलीले ॥१७॥ त्याचे स्मरणसरिसे । प्रगटती स्वप्रकाश । जो सच्चिदानंद जगदीश । जगदात्मा दिगंबरु ॥१८॥ ज्यासि असे प्रारब्ध साह्य । त्यासि नसे कळिकाळाचे भय । तो जेथे जेथे उभा राहे । तेथे राबे विजयलक्ष्मी ॥१९॥ धन्य धन्य ते महाराज दासोपंत । धन्य धन्य ज्याची कीर्ति अद्भुत । ज्यास्तव श्री अवधूत । प्रगटले सहज मनुजरुप ॥२०॥ धन्य त्याची विरक्ति । धन्य त्याची वैराग्यस्थिति । सफळ अनुकूळ असतां संपति । चित्त न गुंगे विषयकामी ॥२१॥ गजांतलक्ष्मी ज्याचे घरी । सर्वलक्षणयुक्त भार्या सुदंरी । इतकी असतांही निर्धारी । वृत्ति तिळभरी न गुंते ॥२२॥ ज्यांस विषय दिसे विषवत । ते केविं गुंततील त्यांत । अवतारपुरुष मूर्तिमंत । जगदोध्दारास्तव अवतरले ॥२३॥ पूर्वी कथा ग्रंथातरी । ध्रुव निघे हुडकीत श्रीहरि । दासोपंतही जातसे तदुपरी । अवधूतभेटीकारणे ॥२४॥ जेव्हां निघाले तेथून पंत । कोणीच न पाहती त्या समर्थ । सर्वा नेत्री मोहन पडत । कोणीच त्यस न रोधी ॥३२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP