दासोपंत चरित्र - पदे २०१ ते २२५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


किंवा न पुसतां निघून । आलासि काय तेथून ? पुनरपि तंटा येईल की जाण । सांग सविस्तर निज तान्हया ॥१॥ तो तरी द्रव्य केवळ सक्त । केवि सोडेल द्रव्यव्यतरिक्त ? । कैसा झालासि तू मुक्त ? । हे आश्चर्ये पै भासते ॥२॥ तो जपत होता करावया यवन । कोणे सोडविले कृपा करुन ? । हे सुखासनादि वैभव पूर्ण । तुजला कैसे प्राप्त झाले ॥३॥ ऐसा कोण भेटला उदार । परोपकारी दयासागर । बाकी पैका देऊन निर्धार । पुत्रा तुज कोणे सोडविला ॥४॥ यापरी ऐकतां पित्याचे वचन । पुत्र बोले काय गजबजून । आपण द्रव्य पाठवितां पूर्ण । तेणेयोगें मी आलो ॥५॥ आपण मासाचा करार करुन । या देशास आला कीं द्रव्य पाठवीन । तेथे मास भरतां पूर्ण । काय वर्तले ते ऐका ॥६॥ शेवट दिनी घटका असता दिवस । सभेस नेऊन मज बाळास । आणखी बोलावून ब्रह्मलोकांस । काय बोले तो पादशा ॥७॥ आजच्यास झाला मास पूर्ण । पैका न पाठविला तुझ्या पित्यान । रात्रौ करीन यास यवन । हे शब्द मजवरी नसे की ॥८॥ ऐकता ऐसी निष्ठुर मात । ब्राह्मणांसि कांही न सुचत । तटस्थ राहिले एकाकडे एक पाहत । मुखी न निघे शब्द कांही ॥९॥ सर्वत्रांचे मुख कोमाइले । कंठ दाटून सद्गद झाले । बाष्पयुक्त दिसती डोळे । बोल विसरती त्या काळी ॥१०॥ तेव्हां माझी काय गती । झाली काय सांगू तुह्मांप्रती । देही नसे कांही भ्रांति । होईल काय कीं ह्मणून ॥११॥ पुनरपि तुमचे चरण । पाहीन या नेत्रांकरुन । ही आशा समुळ सोडून । ध्यात राहिलो कुलस्वामी ॥१२॥ सर्वत्र ब्राह्मण मिळून । आराधिती उमारमण । धांव धांव गा गौरीरमण । या बाळासि संरक्षि ॥१३॥ हा बाळ तो केवळ अनाथ । तूं तरी भक्तवत्सल दीनानाथ । धांव धांव गा कैलासनाथ । करुणाकरा श्रीशंकरा ॥१४॥ यापरी लोक करिता धांवा । काय वर्तले तेधवा । तें ऐकतां स्वानंद जीवा । होईल लोक करितां धांवा । काय वर्तले तेधवा । ते ऐकता स्वानंद जीवा । होईल तुमच्या या काळी ॥१५॥  सभास्थानी सिध्द झाला काजी । मेळवाया स्वप्नामाजी । तत्समयी सहजासहजी । दूत पातला आपुला ॥१६॥ खांदेस असे कांबळा । वर्ण त्याचा मेघ सांवळा । मजकडे पाहुनि वेळोवेळा । काय बोलतसे स्वानंद ॥१७॥ आलो आलो मी सेवक । दिगंबररायाचे फार विश्वासिक ह्मणून माझे हस्तक । द्रव्य पाठविले सर्वस्व ॥१८॥ हुंड्या असे मजपाशी । त्याच्या विश्वास न ये तुह्मासिं । तरी ओतीन द्रव्यराशी । घ्यावें आतां मोजून ॥१९॥ तुमची असेल जी बाकी । ते करुन घ्यावी बेबाकी । जितुके मागाल तितुके । देईन द्रव्य या काळी ॥२०॥ मी तों असे त्यांचा दूत । परी द्रव्य असे अपरिमित । हें घेऊन तुम्ही निश्चित । सोडून देई पुत्र त्यांचे ॥२१॥ यापरी ऐकता दूतवाणी । सर्वत्रांस हर्ष न माये गगनी । मरणसमयी मिळाली संजीवनी । ऐसे त्या लोकांस पै गमले ॥२२॥ सर्वत्रांचे मुखकमल । जें होते को ( ? ) माइले । ते विकसित झाले त्याच वेळे । रवि - रुप दूतउदय होता ॥२३॥ मजही व्यापिले असतां चिंताधारे । तोही दूर केला त्या दूतादिवाकरे । प्रकाश फांकला बाह्यांतर । दश दिशा वोसंडे स्वानंद. ॥२४॥ तेव्हा राजदूत पुसती त्यालागून, । `तूं कोण ? आलास कोठून ? ' । तो ह्मणे नारायणपेठाहून । आलों द्रव्य घेऊन मी ॥२२५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP