TransLiteral Foundation

दासोपंत चरित्र - पदे ४७६ ते ५००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


पदे ४७६ ते ५००
असो ते बाळांस धरिता पोटी । ब्रह्मानंद दाटली सृष्टी । सहजानंदाची लटी । सहज लुटी ते माये ॥७६॥ वारंवार पाहतां बाळांकडे । वृत्ति तिची निजानंदी बुडे । काय वर्णावे ते पवाडे । तिची श्लाध्यता तिलाच साजे ॥७७॥ असो पतीस आठवून चित्ती । तिन्ही बाळा घेऊन हाती । पाळणामाजी निजविती । स्वानंदेसि त्या काळी ॥७८॥ अष्ट भाव ते पाळण । वरी शोभे प्रेम चांदण । शांतीची गादी जाण । तळ शोभती अरुवार ॥७९॥ ऐसिये पाळणामाझारी । पहुडऊनि बाळावतारी । सहजानंदे परोपरी । हल्लरु गाती अनुह्रत ॥८०॥

॥ पाळणा ॥
बाळा, जो जो बा, गुणासांद्रा । ब्रह्मा हरि रुद्रा ॥ बा० ॥ तूं तरि कृपाघन । मी तव सुतहीन कृपाधन न। करुणा परिभुनियां । निज स्नेहे देसी त्रयसुत दान ॥१॥ ध्रु० ॥ अत्रिरायाचे पदकमळी । नमितां वेळोवेळी । त्याचे हे फळ केवळ । पाहिले हे बाळ ॥२॥ षडगुणसंपन्न परिपूर्ण । दिसे हे शिशुरत्न । माझे नयनांचे निजनयन । अंतरज्योति जाण ॥३॥ तुमचा उपकार अपार । उत्तीर्ण नव्हे दातारा । मंगलकारक ते पदरज । जय जय दिगंबर ॥४॥


यापरी गाऊन हल्लर । मुखी करिती जयजयकार । वृत्ती करुन तदाकार । स्वानंदे डुलती अतिशयेसि ॥८१॥ तीस दाटतसे अष्टभाव । कंपस्वेदादि स्वभाव । काय वर्णावे तिचे वैभव । हरिहर खेळती जीपुढे ॥८२॥ धन्य कृपाळू ते ब्रह्मदेव । दूर ठेवूनि आपुली थोरीव । अवतार घेतसे भक्तांस्तव । भक्तमनोरथ द्यावया ॥८३॥ स्त्री वैश्य अथवा शूद्र । ब्रह्मवृंद तो सर्वात अग्र । यांमाजी कोणी शरण राघवेंद्र । रिघतां प्रकटतो यास्तव ॥८४॥ भक्तकैवारी ब्रीद । त्याचे पदी असे सुबध्द । शरणामात्रे सहजानंद । पद देतसे दयाळू ॥८५॥ अनुसूयेचे सेवातप । सर्वस्व जाणोनि अमूप । स्वयं प्रकटले ते चिद्रूप । देवाधिदेव हरिहर ॥८६॥ धन्य ती पतिव्रताशिरोमणि । धन्य तेथील मेदिनी । ही पतिव्रता असे ज्या स्थानी । धन्य धन्य ते स्थळ ॥८७॥ हरिहर प्रकटले ज्या घरी । तेथील तेज्न सामाये अंबरी । अवतारपुरुष उर्वीवरि । अवतरले अविश्रम ॥८८॥ तो बाळरुप भरतां नेत्री । पतिव्रता नसे देहावरी । प्रकाश फांकलासे बाह्यांतरी । कैची तिजला देहभ्रांति ॥८९॥ ज्यास्तव करिती हटयोग । ज्यास्तव साधिती अष्टांगयोग । त्यासही नव्हे दर्शन चांग । जे अनुसूया सहज प्राप्त असे ॥९०॥ असो ते ब्रह्मादि देव । तिचा पाहून अत्यंत भाव । बाळरुपी प्रकटतां स्वभाव । इद्रांदि देव काय करिती ॥९१॥ ह्मणती उत्पत्त्यादि व्यवहार । केविं चालेल साचार । पुढे करावा काय विचार । विचार कांही समजेना ॥९२॥ देवेंद्र ह्मणे समस्तांकारण । मी पतिव्रतामहिमा नेणून । अहल्या अभिलाषिता जाण । सर्वागनयन मी झालो ॥९३॥ आणखी कित्येक लोक । पतिव्रतेचे नेणोनि कौतुक । पावते झाले पतनासि देख । किती ह्मणोनि बोलावे॥९४॥ सीमंतिनी जाणूनि शिवमृडानी । पूजितां दंपत्या अंलकारभूषणी । पुरुष तो झाला कामिनी । विनादें ब्रह्मकुमारु ॥९५॥ यास्तव पतिव्रतामहिमा । न वर्णवे निगमागमा । वचने गुंतूनि सावत्री रमा उमा । हे त्रिवर्ग बाळ झाले की ॥९६॥ पतिव्रतेचे ह्रदयकमळ । पाहून सप्रेम विकसित केवळ । त्रिवर्ग होऊनि बाळ केवळ । प्रेममकरंद पै सेविती ॥९७॥ भ्रमर कोरी काष्ठ कठोर । अरविंदासे धका न लावी अणुमात्र । त्यापरी हे विधिहरिहर । पतिव्रताप्रेमकमळी गुंतले ॥९८॥ आतां या लोकांची मुक्तता । करावी तीच पतिव्रता । तिजवांचून नसे तत्वता । उपाय कांही आणिक ॥९९॥ तीस जरी येईल करुणा । तरीच हे तिघे जाण । येतील आपल्या स्वस्थाना । पूर्वरुप सर्वस्व ॥५००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:51:49.5770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

best estimator

 • उत्तम आकलक 
RANDOM WORD

Did you know?

जर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,893
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,717
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.