मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीदासोपंतचरित्र| पदे ६७६ ते ७०० श्रीदासोपंतचरित्र प्रस्तावना उपोद्धात पदे १ ते २५ पदे २६ ते ५० पदे ५१ ते ७५ पदे ७६ ते १०० पदे १०१ ते १२५ पदे १२६ ते १५० पदे १५१ ते १७५ पदे १७६ ते २०० पदे २०१ ते २२५ पदे २२६ ते २५० पदे २५१ ते २७५ पदे २७६ ते ३०० पदे ३०१ ते ३२५ पदे ३२६ ते ३५० पदे ३५१ ते ३७५ पदे ३७६ ते ४०० पदे ४०१ ते ४२५ पदे ४२६ ते ४५० पदे ४५१ ते ४७५ पदे ४७६ ते ५०० पदे ५०१ ते ५२५ पदे ५२६ ते ५५० पदे ५५१ ते ५७५ पदे ५७६ ते ६०० पदे ६०१ ते ६२५ पदे ६२६ ते ६५० पदे ६५१ ते ६७५ पदे ६७६ ते ७०० पदे ७०१ ते ७२५ पदे ७२६ ते ७५० पदे ७५१ ते ७७८ दासोपंत चरित्र - पदे ६७६ ते ७०० दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत. Tags : dasopantदासोपंतमराठी पदे ६७६ ते ७०० Translation - भाषांतर त्यागून संपूर्ण विषये । ह्रदयी धरुनि दत्तात्रेय । वृत्ति करुन तन्मये । तप करितसे स्वानंद ॥७६॥ आधीच ते सौंदर्यसिंधु । तपबळेच शोभतसे सुखेंदु । त्यास पाहतां तेथील मुनिवृंदु । ब्रह्मानंद मनी होतसे ॥७७॥ मांडून दृढासन । करुन एकाग्र मन । एकाकार आपण होऊन । एकपणे एका ध्यातसे ॥७८॥ एकावांचून नसे अनेक । अनेकी पाहतां एकले एक । जेवि अनेक घटी तरणी देख । एकला दिसे अलिप्त ॥७९॥ एकमेवाद्वितीय ब्रह्म । ऐशी श्रुती गर्जतसे संभ्रम । यास्तव पंत होऊन सप्रेम । एका करितां तप करितसे ॥८०॥ एक तो नामरुपातीत । सच्चिदानंद सदोदित । सहजानंदकारक सद्भक्त - । स्वामी श्रीदिगंबरु ॥८१॥ दिगंबर करुनि चित्तप्रवेश । तप करिता द्वादश वरुषॅं । स्वप्नी प्रकटून स्वप्रकाश । अवधूत काय आज्ञापि ॥८२॥ गंगातीरी राक्षसभुवन । तेथे तूं जाय येथून । वाळवंटी पादुका जाण । असे माझ्या सत्यत्व ॥८३॥ तेथे तूं तप करित असतां । सहज होईल साक्षात्कारता । भेटेन मी अवधूता । अनायासें तुजलागी ॥८४॥ यापरी पाहतां स्वप्न । काय केलें पंत आपण । येते झाले राक्षसभुवन । जेथे पादुका श्रीदिगंबरु ॥८५॥ तेथे पाहतां गंगा गोमटी । पंतास न समाये हर्ष पोटी । साष्टांग वंदून उठाउठी । स्तवन करितसे स्वानंद ॥८६॥ जय जय गंगे त्रितापभंगे । जय जय गंगे शिवजटातरंगे । जय जय गंगे परम सौभाग्ये । सौभाग्यकारके सज्जने ॥८७॥ जय जय गंगे अनंगजनकदोद्भूते । जय जय गंगे सौख्यदाते । जय जय गंगे दारिद्रदु:खहर्ते । सद्भक्तपाळके नमोस्तु ते ॥८८॥ जय जय गोदे गौतमवचनपालके । जय गोदे गोकृतपातकहारके । जय गोदे गोविंदपददायके । भवहारके कल्याणी ॥८९॥ गंगे तव मज्जनरंग । चढती ज्यासि बाह्यांतरंग । त्याचे पायी लोळे अनुराग । सर्व भोग भोगितां ॥९०॥ भोगितां सर्व राजभोग । त्याला न लागे संसाररोग । तव प्रसादें पावे पद अभंग । श्रीरंगाचे निश्चये ॥९१॥ अद्वयानंद भरुन दोन्ही तीर । अखंड वाहतसे निर्मल नीर । त्यावरि उठतसे प्रेमलहर । पाहतां सप्रेम चढतसे ॥९२॥ गंगा गोदा ऐसे म्हणतां । शत योजनी कां असे तो वदता । सर्व पापांपासूनि मुक्तता । करुन देशी विष्णुपद ॥९३॥ अच्युतपदापासूनि तूं च्युत । तरी तव स्नाने देशी अच्युत । ऐसा तव महिमा अत्यद्भुत । आदिमाते श्रीगंगे ॥९४॥ यास्तव तुझे वाळवंटी । सहज वसे श्रीजगजेठी । आतां पाहीन मी निजदृष्टी । स्वामी माझा श्रीदिगंबरु ॥९५॥ यापरी स्तवूनि हरिख । पाहते झाले पादुका सुरेख । कोटिसूर्यप्रभासारिख । दत्तात्रेयाची त्या काळी ॥९६॥ पाहतां पादुकां गोमटी । पंतास न माये हर्ष पोटी । ब्रह्मानंदे दाटली सृष्टी । आटले सहज भेदजळ ॥९७॥ उघडितां दृष्टि अद्वय । वृत्ति झाली तन्मय: । स्तवनस्तुतीचे बोल निश्चये । राहिले सहजसिंहज तेव्हा ॥९८॥ ऐसे होतां घटिका चार । पंत पाहतसे उघडून नेत्र । नेत्री चालिले असे प्रेमनीर । तेणे अभिषिंचती पादुका ॥९९॥ पादुकांची करुन पूजा । जोडून दोन्ही हस्तांबुजां । स्तवन करीतसे सहजींसहजा । योगिराजासि तेधवा ॥७००॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP