TransLiteral Foundation

दासोपंत चरित्र - पदे २५१ ते २७५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


पदे २५१ ते २७५
भक्तकाम कल्पद्रमु । पूर्ण कैवारी, अवाप्तकाम । योगीमनोभिराम आराम । कारक सकळा जनासी ॥५१॥ निजदासा पडतां संकटी । त्यास्तव धांवे उठाउठी । ऐसे ते भक्तवत्सल जगजेठी । त्यांचे उतराई काय होऊं ? ॥५२॥ बाळ मातेची सेवा न करी कांही । परी बाळा कळवळे तीस पाही । त्यापरी स्वामी माझा लवलाही । पावला की मजकरितां ॥५३॥ मज ठाऊक नसे करावी भक्ति । मज न कळे स्तवन स्तुति । धांवा करावा कोण्या रीती । हेंही कांहीच कळेना ॥५४॥ मी पामरांमाजी पामर । पतीतामाजी पतीततर । मम अपराध न मोजितां साचार । का कृपां केली कळेचिना ॥५५॥ ज्यास निरंतर ह्रत्संपुटी । सप्रेम ठेविती भक्तकोटी । त्यासही न घडे त्याची भेटी । तो कैसा प्रकटला दीनस्तव ॥५६॥ ज्यास पूजावा षोडशोपचार । ज्यास बसवावें ह्र्दयमंदिर । तो स्वामी माझा दिगंबर । दीनरक्षकु दयाळू ॥५७॥ आपुले प्रभुत्वाचे बडिवार । सर्वस्व विसरुन एकसर । पाडेवार होऊन साचार । मुक्त केले निज दासा ॥५८॥ आहा दिगंबरा दीनोध्दारा । आहा दिगंबरा करुणाकरा । आहा दिगंबरा दुरितसंहरा । सुखसागरा श्यामरुपा ॥५९॥ आहा दिगंबरा योगीराज । अत्रिवरदा निजजनकाजा । उडी घालिसी सहजी सहजा । दत्तात्रेया दयानिधे ॥६०॥ कालाग्निशमना योगिजनवल्लभा । लीलाविश्वंभरा चैतन्यगाभा । सिध्दराज स्वजनसुलभा । कां झालासि रे करुणार्णवा ॥६१॥ ज्ञानसागरा आद्यंतरहिता । श्रीविश्वंभरा अवधूता । मायामुक्ता मायासहिता । मायानियंता आदिगुरु ॥६२॥ शिवरुप तूं साचार । देवाधिदेव तूं निर्धार । दीनवत्सला दिगंबरा । दीनोध्दारा जगत्पते ॥६३॥ कृष्णश्यामा कमलनयना । कलिकल्मषहरा करुणानिधाना । करणाक्रियातीत तूं निर्गुणा । निष्कलंका नि:संगा ॥६४॥ मज दीनास्तव तूं पाडेवार । कैसा झालासि रे । श्रीदिगंबरा । मी अपराधी हे अपराध थोर । क्षमा करी रे । क्षमार्णवा ॥६५॥ यापरी गर्जता दीर्घस्वर । नेत्री चालिले प्रेमनीर । अष्टभाव दाटला बाह्यांतर । स्वेदकंपादि त्या काळीं. ॥६६॥ त्यास कांहीच नसे देहभ्रांति, । हें मी काय बोलतों पुत्राप्रती ? । संपूर्ण गळाली अहंकृति । सहजानंदी ते निमग्न ॥६७॥ मग ऐसे होतां क्षणेक । बोले काय पुत्रासि हारिख । धन्य धन्य रे । तूं सद्भक्त टिळक । तुज भेटला की दीन बंधु ॥६८॥ आह्मी तो केवळ क्रूर निष्ठुर । क्रूरा स्वाधीन करुन तुज कुमर । निघून आलों देशांतर । स्वजीवाचा मोह धरुनि ॥६९॥ कैचे आह्मी जननीजनकु । कैचे आह्मी तुज प्रतिपाळकु । हे असत्य दिसे सकळिकु । पिता तुझा कुलस्वामी ॥७०॥ तो जगाचा जननीजनकु । तो भक्तकैवारी भक्तरक्षकु । भक्तवत्सल भक्तानंदकारकु । भयमोचक भवारि ॥७१॥ तोच होऊन पाडेवार । धांवला असे तुज कैवार । तुझे दैवास नसें पार । पाहिलासि ते मूर्ति ॥७२॥ धन्य ह्मणावें पादशास । धन्य ह्मणावें त्या देशास । धन्य असे तेथील लोकांस । ते मूर्ति पाहिली प्रत्यक्ष ॥७३॥ जो ब्रह्मादिकांसि दुर्लभ । तो कैसा झाला सुलभ । तो भक्तकैवारी भक्तवल्लभ । अभिनव करणी प्रभूची ॥७४॥ आह्मी केवळ दैवहीन । आह्मी केवळ मलीन । कैचे घडेल दर्शन । प्रभूचे आतां मजलागी ॥२७५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:51:49.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

intentionality

 • सविषयता, विषयिता 
 • स्त्री. उद्देशता 
RANDOM WORD

Did you know?

आषाढी एकादशीला "देवशयनी एकादशी" का म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,751
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,781
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.