TransLiteral Foundation

दासोपंत चरित्र - पदे ५५१ ते ५७५

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.


पदे ५५१ ते ५७५
तुह्मां ध्यातां हत्संपुटी । समुळ यासे अनेक त्रिपुटी । एकच तंतु अनेक पटी । यापरी दृष्टि त्यासि उघडे ॥५१॥ उघडितां ज्यास एकच दृष्टि । त्यांजला कैची भिन्न सृष्टि । भिन्नाभिन्ना समूळ आटी । अद्वय लुटी सहज लुटिती ॥५२॥ यापरी तुमचें ध्यान महिमा । अगम्य अगोचर निगमागमा । व्यासादिकांच्या मतीसि सीमा । झाली तुह्मां वर्णितां ॥५३॥ नेणो अनेक जन्मी सत्कर्म । ब्रह्मापर्णबुध्दी आचरलों परम । तरीच तुमची पादपद्मे । दृष्टि भरुन पाहिलों ॥५४॥ तुह्मांस्तव करितो मंत्रानुष्ठान । तुह्मांस्तव साधिती पंचाग्निसाधन । तुह्मांस्तव हिंडती वनोवन । परी दर्शन दुर्लभ ॥५५॥ तुह्मांकरिता करिती दान । तुह्मांस्तव अग्निष्टोमादि सत्कर्म । वापीकूपतटादि वनविश्राम । करितां दर्शन नव्हेचि ॥५६॥ गंगा, यमुना, सरस्वती । पावन करिती विश्वाप्रती । तेविं तुह्मी मज आळशास निश्चिती । पाचन केलें दर्शने ॥५७॥ आतां तुमच्या उपकारा । उत्तीर्ण नव्हे हो दातारा । कीं चुकविले माझें येरझारा । सहज तुह्मां नमितांचि ॥५८॥ तुमच्या नमनासरिसां । भ्रांति विराली नि:शेष । काय प्राप्त झाले हर्ष । हेंही कांही कळेना ॥५९॥ कळे ना कळे याहून वेगळे । तेच ते तुह्मी स्वानंदपुतळे । मज तारिले निज कृपाबळे । बाळक तुमचा जाणोनि ॥६०॥ अनंत जन्मीचे सुकृत अमूप । आज दिसतसे फलद्रुप । कां पाहिले आपुले स्वरुप । नेत्र भरुन स्वानंद ॥६१॥ यापरी बोलोनि त्यांसि । पुनरपि वंदितां त्रिवर्गासि । तेही तोषून निज मानसी । बोले काय मुनीप्रती ॥६२॥ " धन्य धन्य बापा अत्रिराया । धन्य पतिव्रता तुझी जाया । तिचे तप उत्कृष्ट पाहूनियां । पातलो आह्मी सर्वस्व ॥६३॥ नेणों तिचें तपवैभव । वाटे आह्मां अति अभिनव । आह्मां बाळ करुनि सर्वस्व । खेळविले जिने आनंदे ॥६४॥ सावित्री, लक्ष्मी, भवानी । जीस आले लोटांगणी । धन्य ती पतिव्रताशिरोमणी । करणी तिची अगाध ॥६५॥ आतां तुह्मां आह्मी सुप्रसन्न । वर मागावे इच्छित मन । ते देऊन वरप्रदान । शीघ्र जाऊं स्वस्थळा ॥६६॥ ऐकतां देवांची वरदवाणी । पुनरपि मस्तक ठेवून चरणी । बोले काय अत्रि मुनि । हरिहरांसि आल्हादे ॥६७॥ " जीस्तव झाले आपुले येणे । तिलाच द्यावे वरप्रदान । मी कृतकृत्य आपुले दर्शने । इच्छा कांही नसेचि ॥६८॥ इच्छाचि जे परी तृप्तता । तुमचे पायचि तत्त्वतां । तेथे माझे मस्तक असतां । मागणें कांही नसेचि ॥६९॥ मागण्यास तरी दूर आपण । यास्तव मागणें नको मजकारण । मागण्याची झाली पूर्ण । पूर्ण श्रीचरण पाहतां ॥७०॥ आपुले चरण तो अति सोवळे । मागणे मांगाचा विटाळ । कदां न व्हावा अनाथ बाळ । हीच इच्छा पै असे ॥७१॥ यापरी अत्रीची विनंति । ऐकतां देव तोषून चित्ती । बोले काय अनुसूयाप्रती । " वर मागे, वो पतिव्रता. '' ॥७२॥ मग अनुसूया तेव्हां केले काय । सिध्द करूनि आसनत्रय, । त्यावरी बैसवी हरिहरराय । त्यांच्या स्त्रियांसहित. ॥७३॥ सावित्री आणि कमलासन । कमळजजनक आणि कमळा संपूर्ण । गौरीवराहवर्तमान । पूजिती झाली स्वानंद ॥७४॥ करुन आधी स्वानंद पूजा । वंदूनि अत्रिचरणांबुजा । काय वर मागती अत्रिभाजा । हरिहरासि त्या काळी ॥५७५॥ "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:51:49.7330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

language pay

  • न. भाषा वेतन 
RANDOM WORD

Did you know?

जर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.