मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीदासोपंतचरित्र| पदे ५०१ ते ५२५ श्रीदासोपंतचरित्र प्रस्तावना उपोद्धात पदे १ ते २५ पदे २६ ते ५० पदे ५१ ते ७५ पदे ७६ ते १०० पदे १०१ ते १२५ पदे १२६ ते १५० पदे १५१ ते १७५ पदे १७६ ते २०० पदे २०१ ते २२५ पदे २२६ ते २५० पदे २५१ ते २७५ पदे २७६ ते ३०० पदे ३०१ ते ३२५ पदे ३२६ ते ३५० पदे ३५१ ते ३७५ पदे ३७६ ते ४०० पदे ४०१ ते ४२५ पदे ४२६ ते ४५० पदे ४५१ ते ४७५ पदे ४७६ ते ५०० पदे ५०१ ते ५२५ पदे ५२६ ते ५५० पदे ५५१ ते ५७५ पदे ५७६ ते ६०० पदे ६०१ ते ६२५ पदे ६२६ ते ६५० पदे ६५१ ते ६७५ पदे ६७६ ते ७०० पदे ७०१ ते ७२५ पदे ७२६ ते ७५० पदे ७५१ ते ७७८ दासोपंत चरित्र - पदे ५०१ ते ५२५ दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत. Tags : dasopantदासोपंतमराठी पदे ५०१ ते ५२५ Translation - भाषांतर यापरी सुरगुरुप्रति । पाकशासन बोले करुन खंती । इकडे सावित्रीउमारमांची स्थिती । पतीस्तव चिंतीती अपार ॥१॥ तत्समयी येऊन देवर्पि । बोले काय त्या तिघ्यांसि । तुमचे पति तरी निश्चयेसि । अनुसूयाघरी बाळ झाले ॥२॥ तिघे होऊन सुकुमार बाळ । तिचे ह्रत्पाळण्यांत करिती खेळ । आतां तुह्मी निजसामर्थ्याजवळ । पूर्ववत करुन आणावे ॥३॥ मी वर्णिता पतिव्रतेचे गुण । ते विषाद भासले तुह्मांकारण । आतां तरी तिचे सामर्थ्य पूर्ण । कळले की तुह्मांसि ॥४॥ तुह्मी तरी देवांगना । तुमचे सत्तेने हे जग जाणा चालतातां परिपूर्ण । तुह्मां तरी काय चिंता ॥५॥ ती तरी ब्राह्मणाची सती । तिचे सामर्थ्य तरी किती । तुह्मी आदिशक्त्या निश्चिति । तुह्मांपुढे ती काय ॥६॥ यापरी मुनीचे विनोदवचन । ते तिघ्या ऐकतां चिंता करुन । पुनरपि पुसती नारदालागुन । उपाय आपण सांगावा ॥७॥ आपुले वचनी विश्वास न करिता । सत्व पाहिले पतिव्रता । त्याचा अनुभव आह्मां आता । सहज सिध्द पै प्राप्त ॥८॥ आह्मां पतिप्राप्तीचा उपावो । सांगावा जी मुनिरावो । यापरी बोलोनि सद्भावो । मुनीसि वंदिती सप्रेम ॥९॥ मग हांसोनि बोले देवर्षि । तुह्मी शरण जावें अनुसूयासि । तरीच पतिप्राप्ति तुह्मासि । होईल सत्य जाणावे ॥१०॥ तीच कृपा करुन पूर्ण । तुह्मां देईल पतिदान । यावीण नसे आणिक साधन । तुमच्या पतिप्राप्तीस्तव ॥११॥ ते तिघे उत्पात्त्यादि व्यवहार । करितां पावून श्रम फार । श्रमनिवारणार्थ निर्धार । बाळ होऊन ते राहिले ॥१२॥ पिऊन तिचे प्रेमदुग्ध । झाले तीते ब्रह्मानंद । पुनरपि यांचे निजपद । हेंही त्यांस नसेचि ॥१३॥ पतिव्रतेचे सद्भावपालनी । क्रीडती सहजानंदे करुनि । यास्तव तुह्मी तिजलागुनि । शरण जावें सद्भावे ॥१४॥ मुनिवचनी करुन विश्वास । निघत्या झाल्या होऊन हर्ष । पातल्या अनुसूयामंदिरात । प्राणनाथाचे प्राप्तीस्तव ॥१५॥ स्वआश्रमा आल्या देवांगना । ऐसे जाणून ऋषिअंगना । या तिंघीसि देऊनि आलिंगना । अंतरगृही पै नेले ॥१६॥ तिन्ही दार उल्लंघून । तिघ्यांसहित प्रवेशली चौथे भुवन । जेथे खेळे आदिनारायण । त्रयमूर्तिरुप सुकुमार ॥१७॥ अनसूयाप्रेमपाळणी । त्रिबाळे पाहतां नयनी । ते तिघ्या करिती विस्मय मनी । हे काय नवल पै असे ॥१८॥ अनसूया केवळ तुर्यारुपिणी । अनुसंधानदोर हाती धरुनि । जो जो ऐसे अनुहतध्वनी । हल्लरु गाती अति हर्षे ॥१९॥ मुखी गाता हल्लरु । वृत्ति झाली तदाकारु । करीत असतां जो जो गजरु । तत्समयी पातले अत्रि मुनि ॥२०॥ महाराज केवळ ज्ञानराशी । पार नसे ज्यांच्या तपासि । तापशांमाजी व्योमकेशी । ऐसे गमतसे मुनि ॥२१॥ ज्यांचे तेज न माये अंबरी । ज्यांचेनि धन्य तेथील धात्री । ज्यांची भार्या अनुसूया नारी । आगळा पतिव्रतांमाजी ॥२२॥ पति आले निज आश्रमा । जाणून ती पतिव्रतोत्तमा । सप्रेम उठून पादपद्मा । नमीतसे स्वानंद ॥२३॥ कांतेस पुसे मुनेश्वर । जो जो शब्दांचा गजर । तुजला कैचे प्राप्त कुमर । हे काय सविस्तर सांग तूं ॥२४॥ येरी मस्तक ठेवून चरणी । प्रेमाश्रूने आभिषिंचूनि । करद्वय जोडून दीनवाणी । वास्तव्य आदि निवेदिले ॥५२५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP