TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
नाहीं वक्त रेणुके भला

पद - नाहीं वक्त रेणुके भला

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


नाहीं वक्त रेणुके भला
नाहीं वक्त रेणुके भला । माझी करुणा यउं दे तुला ॥
तूं असं म्हणूं नको मला । अतां हाणून लावा याला ॥धृ०॥
धड येत नाहिं बोलतां । एक अक्षर नये लीहितां ।
म्हणे दात खाउनी पिता । अतां० ॥१॥
भाऊ म्हणति रिकामा शिण । याचें काय घेतलें ऋण ।
म्हणे पाठिचीच बहिण । अतां० ॥२॥
अर्थाचि मामि मावशी । कांहिं नाहिं म्हणति यापाशीं ।
आइ म्हणे करुं गत कशी । अतां० ॥३॥
पुढें हात करुन बायको । म्हणे समसम याची नको ।
हा दगड कपाळचा चुको ॥ अतां० ॥४॥
नाहीं अंगांत गुण सरसा । नाहीं हातांत एक पयसा ।
कुणी म्हणेना जवळ या बसा ॥ अतां० ॥५॥
माझा फिरला आहे दिवस । कुणीं घेइना देव नवस ।
अवघेचि करिति वसवस ॥ अतां० ॥६॥
दीन जनाचि तुज आवडी । अशि कीर्ती आहे केवढी ।
तूं म्हणुं नको गोष्ट येवढी ॥ अतां० ॥७॥
म्हणे विष्णुदास तुजकडे । आलें तुजवर हें सांकडें ।
तूं म्हणूं नको हो पलिकडे ॥ अतां० ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:48.2200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कां च

  • पु. १ जाच ; त्रास ; छळ . ' चांगल्या गोष्टी मनुष्यास हव्या खर्‍या पण ... त्यांचेपासुन त्यास कांच बसावा अशासाठीं त्या नकोत ' - अमृताचा घूटका ( उषा ग्रंथमलिका ) ९ . २ दुःख ' पाणी मीच पाही तृण घाली मीच । मजणीव काच मनीं वाहे । ' - ब . १४ . ( कांचणें ; सं . कच् = बांधणें ; किंवा कांच् = बांधणें ) 
RANDOM WORD

Did you know?

मूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.