मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे| ओव्या दळणाच्या भूपाळी आणि पदे नमनपर पद शारदास्तवन जयजयकार वंदे मातरम् जगदंबे श्रीरेणुकेची प्रार्थना भूपाळी १ भूपाळी २ भूपाळी ३ भूपाळी ४ ओव्या दळणाच्या घनाक्षरी गोंधळ जगदंबे अंबे रेणुके माझे आई धांवे पावे धांव ग माझी लाज धांव दयाळे ये सावळे अंबाबाई तुळजाबाई जय भवानि जननी दर्शनासि योग्य कधीं भेटशिल श्रीमूळपीठनायके कृपा कर बोल भवानी भवानी जयजय तुम्हांला पावलि जगदंबा आम्ही चुकलों राहुन गेलि मनांत काय कारण हा गांव नाहीं ग भला कुत्रा आलं चहुंकडुनी अभाळ ग खचितचि मग तूं मी लेकरुं तूं माय कशी करशील भवपार शुभवदने रेल गाडींत बसून चाल रेणुके काय बाई समज बाई असं म्हणुं नको बाई धरीन पदरास माय रेणुके मुळपिठवासिनि काय म्हणावें तुला नाहीं वक्त रेणुके भला आई जगदंबा श्रीमंत अबोला आठवण असं नको करुं अंबाबाइ आई भवानी मजला मुळ धाडी आई, खरंच ग आदिश्रीजगदंबा गिरिजा प्रकट मूळपीठादि भवानी ही परम कृपेची माउली हो कटाव रेणुकेचा ओव्या दळणाच्या श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा. Tags : kavyapoemvishnudasकविताकाव्यपदमराठीविष्णुदास ओव्या दळणाच्या Translation - भाषांतर आदिनमन गणपतिला । गणासहित सरस्वतिला ।शुभ मंगळाऽरंभ केला । ओवी गाईन रेणुकेला ॥धृ०॥सदा प्रसन्न रुप गोमटी । जशि शिव्याच्या गंगा जटीं ।तशि अखंड या मुळपिठीं । माय राहिलि दीनासाठीं ॥श्रीमृगराजाचलपाठीं । शतसहस्त्र ऋषींच्या थाटीं ।देव तिष्ठति तेतिस कोटी । माय राहिलि दीनासाठीं ॥बहु खगमृगतरुंची दाटी । खडे कंटक वाटोवाटीं ।एवढी सोसुन आटाआटी । माय राहिलि दीनासाठीं ॥रुचि प्रेमाचि लाववि ओठीं । तुपसाखर, फेणी, ताटीं ।करिं दुधाचि घेउन वाटी । माय राहिलि दीनासाठीं ॥दीन जनांचि चिंता जिला । धिर क्षणभर पडे ना तिला ।शुभ मंगळाऽरंभ केला ॥१॥तुला होइल आई नजर । तुझा मुखचंद्र नादर ।तुझें सगुण रुप सुंदर । शोभे पिवळा पीतांबर ॥धृ०॥तूं चतुर गुणगंभीर । सडपातळ तुझि कंबर ।तुझि अखंड भर उम्मर । शोभे पिवळा पीतांबर ॥वर अर्पिसि अजरामर । तुला वंदिति मुनि सामर ।शिरिं वारिती गण चामर । शोभे पिवळा पीतांबर ॥तुझा अंकित विधिहरिहर । तुझ्या गळ्यांत उत्तम हार ।तुला दागीने शत शंभर । शोभे पिवळा पीतांबर ॥तुला पहातां मोह करपला । जड - देहभाव हरपला ।शुभ मंगळाऽरंभ केला ॥२॥कलिरायाचें हें नगर । याचें नांव कंटकपुर ।महागांवांत सासर - घर । माझें माहेर मातापुर ॥धृ०॥सदा भंडार घर भरपुर । सदा वाजतिं पदिं नूपुर ।सदा सुगंध दीप कर्पूर । माझें माहेर मातापुर ॥परदेशीं मी पडलें दुर । आड आले गड, डोंगर ।बाणगंगेला आला पुर । माझें माहेर मातापुर ॥काय तुझ्यांत नसे मगदुर । काय म्हणसि रहा दुर दुर ।नको डोळ्यांत घालुं शेंदुर । माझें माहेर मातापुर ॥खळ रावण वंगळ मेला । जशि जानकि नेलि लंकेला ।शुभ मंगळाऽरंभ केला ॥३॥किति मनासि या आवरुं । धिर अझून कुठवर धरुं ।मी अनाथ दिन लेंकरुं । नको माझि उपेक्षा करुं ॥धृ०॥नको उगि मजवर गुरगुरुं । तूं बाप, माउली, गुरु ।मी अनाथ दिन लेंकरुं । नको माझि उपेक्षा करुं ॥माझी रक्षण कर आबरु । नको प्राणसखे घाबरुं ।मी अनाथ दिन लेंकरुं । नको माझि उपेक्षा करुं ॥धनदौलत नलगे मला । डोळे भरुन पाहुं दे तुला ।शुभ मंगळाऽरंभ केला ॥४॥अतां पहातिस ग काई । उडी घाल, ये लवलाही ।दिनदयाळे माझे आई । ब्रिद संभाळ अपुलें बाई ॥धृ०॥तूं विटेवरची विठाई । मुळपिठाची तूं पिठाई ॥दिनदयाळे माझे आई । ब्रिद संभाळ अपुलें बाई ॥विष्णुदास लागे पायीं । करिं करुणा अंबाबाई ।दिनदयाळे माझे आई । ब्रिद संभाळ अपुलें बाई ॥येसि धांवुन एक हांकेला । असा महिमा बहु ऐकिला ।शुभ मंगळाऽरंभ केला ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP