TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
धांव दयाळे

पद - धांव दयाळे

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


धांव दयाळे
( चाल - श्रीविधि हरिहर मूर्ति )
धांव दयाळे, अतां रेणुके, संकट पडलें मला ।
तूं दीनाची माय म्हणुन मी, हांका मारितें तुला ॥धृ०॥
या दैवगतीच्या पायीं, बाई परदेशीं मी पडलें दूर ।
आड पडले भवसागर डोंगर, पुर लष्कर इंदुर ॥
कामक्रोध षड्रिपु हे व्याळ जसे, कवटाळिति दर्दुर ।
मज गांजाया या मेल्यांची, काय होती मगदुर ॥
गाय कसाबा हातीं देउनी, कसि रहातिस दुरदुर ।
निष्ठुर हो उनि कां घालिसि धड डोळ्यांमधें शेंदुर॥
चाल - संसारीं सुख मज नाहीं, किति राहुं दुःख साहून ।
किति धीर जीवाला देऊं, किति दिवस वाट पाहून ॥
रात्रंदिन मी तळमळते, किति धाडुं पत्र लीहून ।
म्हणे विष्णुदास तरी गाणें, किति दाऊं नित्य गाऊन ॥
चाल - नको उपेक्षा करुं भेटुनी, पुरवि माझे हेतुला ॥१॥ तूं दीनाची ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:46.4700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डबडबणे

  • अ.क्रि. १ बदबद वाजणे ; ढबढबणे ( ढिला पडलेला मृदंग , डफ इ० ) [ ध्व . ] २ काठापर्यंत , तंतोतंत भरणे ( भांडे , नदी , विहिर ). रात्रीच्या पर्जन्याने सकाळला विहीर डबडबली . ३ अश्रूंनी भरुन येणे ( डोळे ). ४ पडसे इ० नीं बेजार होणे ; थंडी होणे . [ ध्व . डब ! डब ! डब ! हिं . डबडबाना ] डबडबीत - विक्रिवि . भरपूर ; आकंठ ; कांठोकांठ . ( क्रि . भरणे ). 
RANDOM WORD

Did you know?

अंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.