मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
रेल गाडींत बसून चाल

पद - रेल गाडींत बसून चाल

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


रेल गाडींत बसून चाल । धटि नेसून तांबडी लाल ॥धृ०॥
तुज तन मन धन, केलें समर्पण । नको रागानं फुगवूं गाल ॥१॥
तुझी तनु कवळी, अंगावर पिवळी । शोभे नारळी पदरी शाल ॥२॥
तुझें रुप लावण्य, तुझें गुण अगण्य । तुझें तारुण्य वय चिरकाल ॥३॥
सरि गोफ पुतळ्या, नथ फुल बाळ्या । तुझ्या मोत्याच्या लडिमधें लाल ॥४॥
मुखचंद्र निर्मळ, कुंकुम काजळ । तुझ्या वेणीचे मोकळे बाल॥५॥
तुज करितां नवी, कंचुकि हिरवी । जरिकाठाची बेतली काल ॥६॥
कंकण पैंजण, वाजती खणखण । तुझी मंद गजाकृति चाल ॥७॥
सुगंध भरपुर, चंदन कर्पुर । उडें केशरी रंग गुलाल ॥८॥
अति सकुमारी तूं, राजकुमारी । पायवाटेनं होतिल हाल ॥९॥
नवरंगाचा, नव भिंगाचा । तुझा अभंग रंगमहाल ॥१०॥
विषवत्‍ नावडे, राज्य तुझ्यापुढें । गृहलक्ष्मी कवडी माल ॥११॥
विष्णुदास म्हणे, अम्ही मनरमणे । तुला पाहून सदा खुशाल ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP