मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
कशी करशील भवपार

पद - कशी करशील भवपार

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


कशी करशील भवपार । मी भवानी ! जड अपार ॥धृ०॥
द्विजकुळिं जन्मुनी, झालों मी कामिनी - । चर्म कुटित चांभार ॥१॥
बनलों सारस, कीं रसना रस - । कर्दमांत कुंभार ॥२॥
जगीं मजसम मी, भ्रष्ट कुटिळ खळ । अखिल पाप संभार ॥३॥
व्यर्थचि अवनीं, जन्मलों जननी - । जठरिं दगड भूभार ॥४॥
न तारवे तरी, कल्पलते करी । या तन - शिळेचा पार ॥५॥
विष्णुदास म्हणे, दिन जननी दिन -- । वत्सल ध्वज ऊभार ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP