TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
जयजयकार

पद - जयजयकार

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


जयजयकार
नमो श्री जय मंगल मंगलेश्वरी । जय जय नमो श्रीवाचेश्वरी ।
जय जय श्रीगुरुजननी जनकेश्वरी । भुवनेश्वरी रेणुके ॥१॥
जय जय अनंतब्रह्मांडस्वामिनी । जय जय अनंतब्रह्मांडव्यापिनी ।
जय जय अनंतनामसगुणस्वरुपिणी । श्रीनारायणी रेणुके ॥२॥
जय जय नमो श्रीमूळपीठ - नायके । जय जय नमो श्रीमहाकालिके ।
महालक्ष्मी महासरस्वति विधिबालिके । भ्रमरांबिके रेणुके ॥३॥
जय जय नमो श्री सौभाग्यवंते । षड्गुण - ऐश्वर्यालंकृत श्रीमंते ।
जय जय अनंतानंते भगवंते । कृपावंते रेणुके ॥४॥
जय जय सुंदरसुप्रसन्नवक्त्रे । जय जय नमो श्रीपंकजनेत्रे ।
जय जय नमो श्रीकोमलगात्रे । परमपवित्रे रेणुके ॥५॥
दुर्गे दुर्घट - वरदायिनी । कला - लतिके कैवल्यदानी ।
जगन्नायिके जगज्जननी । जय जय भवानी रेणुके ॥६॥
आपुलीया ब्रीदासाठीं । माझिया अपराधांच्या कोटी ।
क्षमावंते, घालोनी पोटीं । क्षमा करीं वो रेणुके ॥७॥
प्रसन्नवरदें, प्रसन्न होई । प्रसन्न शब्दे परामर्श घेई ।
प्रसन्नानंदे प्रसाद देई । माझे आई रेणुके ॥८॥
आपुल्या कृपाकटाक्षाचे प्रौढीं । अनाथ रक्षिले अनंतकोटी ।
तया कृपामृतांतुन मजही थोडी । भिक्षा वाढी रेणुके ॥९॥
पुरुषोत्तमस्वामिचे अंतरंगे । अभंगसौभाग्ये, दुरितभंगे ।
घेई सुखसंगे वो, मज वोसंगें । माय गंगे रेणुके ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:45.4370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

inner capillary water

  • अंतःकेशिका जल 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site