मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
अंबे

पद - अंबे

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : माझ्या मनीचें हितगुज सारें )
श्रीजगदंबे, अंबे, रेणुके, यावें लवलाही
निशिदिनिं स्तवितों पदकमला, तव दर्शन मज देई ॥धृ०॥
उत्पत्तिस्थितिलय - कारण ही इच्छा तव माते
ब्रह्माविष्णूशंकरमूर्ती वर्तति तव सत्तें
इच्छामात्रें ब्रह्मगोळ हा नाचविसी आई ॥ निशि० ॥१॥
सुरगणरक्षण असुरनिवारण कारण सगुणाला
प्रणतप्राणीपतितोद्धारा धरुनी रुपाला
मुनिजन - मानस - हंस परात्पर ध्यातीं निजह्रदयीं ॥ निशि० ॥२॥
लोपति रविशशि मुख - प्रभातळिं अगणित खद्योतसे
शोभति मौक्तिक - रत्न - सुमन - हार, दिव्यांबर खासें
सोहं सोहं शब्दें गर्जति नुपुरें तव पायीं ॥ निशि० ॥३॥
परमकृपाळे, दीनदयाळे, अंबे, आदिमाये
सिंहाद्रीवरि वास करिसि तूं भक्तास्तव पाहे
विष्णुदास पदिं रक्षण करुनी निर्मळ यश देई ॥ निशि० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP