TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
कधीं भेटशिल

पद - कधीं भेटशिल

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


कधीं भेटशिल
( चाल : सुनोजी साई वचन हमारा. )
कधीं भेटशिल आई जगदंबे, खचित सांग तूं मला मला
जोंवर आहेत प्राण कुडिमधें तोंवर पाहुं दे तुला तुला ॥धृ०॥
मोठिच पोटीं आस तुझें रुप डोळे भरुन पहावया बया
जन्मचि सारा गेला अशामधें, आलि दशा जुनि वया वया
परंतु नाहीं आलि दिनाची तुझ्या मनामधें दया दया
निबर तरि तुझें काळिज केवढें धन्य धन्य अग बया बया
गोड वाटतो तुझा तुला परि स्वभाव नाहिं हा भला भला ॥१॥
राज्य कठिण हें आलें कलीचें वर्तमान भलें नव्हे नव्हे
प्रजा - वृत्ति - धन हरण कराया निघति कायदे नवे नवे
घरोघरीं अंधार परंतू रस्तोरस्तीं दिवे दिवे
दया, धर्महि न; माय लेंकरा उठे माराया जिवें जिवें
काय उफराटें कर्म म्हणावें कसे कांटे आले फुला फुला ॥२॥
तूं आदिमाये, ही या कलिच्या, आधीन झालिस यदा यदा
तव आज्ञेचि ठेविनि वागती, विधि - हरिहर मर्यादा यदा
कामधेनुची लेक घरोघरीं,  ताक मागे ओखदा खदा
व्यास वाल्मिकादीक मुनीजन, पाहुन हंसतील खदा खदा
दिन जननीचें निरक्षुनी ब्रिद, लक्ष्मी आपुल्या मुला मुला ॥३॥
नाहिं भरवंसा घालिल फांसा, काळ गळ्यामधें केव्हां केव्हां
काय कौतुक मग पहाशिल आमुचें, जगज्जननी तूं तेव्हां तेव्हां
कळेल तसें पुढें करी परंतु, दे दर्शन मज येव्हां येव्हां
थोर तुझा उपकार आठविन, जन्मा येईन जेव्हां जेव्हां
यास्तव एवढी ऐक विनंति, पूर्ण करी हेतुला तुला ॥४॥
कामक्रोध दिर दुर्ध्र मेले प्रपंचवनिं हांकिती किती
खचित प्राण घ्यावया पहाती; ताप सांगुं हा किती किती
अहंकार सासराहि सासू विकल्पना कोपती अती
परंतु कांहीं बोलत नाहीं निसंग माझा पती पती
तुजकडे पहातें उगिच रहातें बाळगुनी अब्रुला ब्रुला ॥५॥
सत्वर आतां ने मज माहेरिं ठेवुं नको सासरीं तरी
दे साडी मज जुनीपुराणी, नको सोन्याची सरी सरी
जळो दुसर्‍यांचे हार पितांबर, आईची येई ना सरी सरी
जवळ बसूनी गोड बोल मशि, नको दमडि ना सरी परी
विष्णुदास म्हणे आइ रेणुके, तुझ्या नमितों पाउला उला ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:46.8130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कृताकृत

  • वि. १ बेपर्वा ; उदासीन ; आवश्यकहि नव्हे व अयोग्याहि नव्हें असा ( केल्या तरी चालतील , न केल्या तरी चालतील अशा गोष्टींसंबंधी ). ( सं . कृत + अकृत ) २ निष्काळजीपणानें अनास्थेनें केलेलें ; कांहींहि आस्था नसुन केलेलें किंवा मुळींच गाळलेलें ; अर्धवट ; अपूर्ण . ' त्याचें घरीं आचार कृताकृत आहे .' - न . केवळ संभवनीय स्थिति ; घडण्याची किंवा न घडण्याची संभवनीयता ज्यांत सारखी आहे अशी स्थिति . अल्पस्वल्प सत्व , अस्तित्व . ' यंदा दुभत्यांचें कृताकृत दिसतें .' ( कृत + अकृत ) 
  • a  Indifferent, neither incumbent nor improper-used of matters which may be either done or left undone. Negligently performed, performed or omitted with perfect unconcern. Ex. त्याचे घरीं आचार कृताकृत आहे. 
  • $s n$ A state of mere possibility, a state in which the occurrence and non-occurrence of a matter seem equally probable. 
RANDOM WORD

Did you know?

Sarva namaskar havet.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.