मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
माय रेणुके

पद - माय रेणुके

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : मुंबईत मजा गमतीची )
आदि माय रेणुके माझें । तुज काय वाटलें ओझें ॥धृ०॥
आनंदी सदानंद मंदिरे । अखंड सौभाग्य श्रीइंदिरे ।
त्रितापांतके त्रिपुरसुंदरे । तुझें सगुणरुप वीराजे ॥ तुज० १॥
तुझ्यागृही षड्गुणसंपत्ती । सदाशिव ब्रह्मदेव श्रीपती ।
अणिमादि ऋद्धि सिद्धि नांदती । वंदिती देव ऋषि राजे ॥ तुज० २॥
कल्पतरु कामधेनु चहुकडे । चमकती चिंतामणिचे खडे ।
दीन जननि तुला सांकडें । कां पडलें दिनाचे काजें ॥ तुज० ३॥
पतितजन येतां तुझिया गडा । करिसि भवबंदाचा उलगडा ।
अर्पिसी सुखामृताचा घडा । चौघडा असा जगिं वाजे ॥ तुज० ४॥
ऐकुनि दुष्ट शत्रुचा फंद । तोडुं नको स्वमुलाचा संबंध ।
मोडुं नको मार्ग करुनी बंद । मोक्षाचे चारि दरवाजे ॥ तुज० ५॥
मुळपिठ वासिनि तूं श्रीविद्या । त्रिभुवन पावन जिवशिववंद्या ।
गुरु दत्तात्रय तद्रुपीं संध्या । करित तिन्ही सांजे ॥ तुज० ६॥
ग्रासितो काळ मला दिनरात्र । परि नये दया तुला तिळमात्र ।
कां होसि निमित्तासि या पात्र । तूं शरणागतभवभंजे ॥ तुज० ७॥
प्रेमरस - पानाची आवडी । कृपेनें भिक्षा दे येवढी ।
विष्णुस्वामीसि पावली पुडी । दधि क्षिर घृत साखर सांजे ॥ तुज० ८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP