मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
आलं चहुंकडुनी अभाळ ग

पद - आलं चहुंकडुनी अभाळ ग

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


आलं चहुंकडुनी अभाळ ग । लेंकरुं आपुलें संभाळ ग ॥धृ०॥
कशि बाइ निजलिस घरांत ग । निचिंत झोंपेच्या भरांत ग ।
फिरति मेघ अंबरांत ग । धडकिच भरली उरांत ग ।
वार्‍यानं उठलें कपाळ ग । आलं चहुंकडून० ॥१॥
तिळभर दिसे ना उघाड ग । दिवस लपला ढगाआड ग ।
झालें काळकुट घबाड ग । आम्हि नाहिं सांगत लबाड ग ।
येइल पाणी बंबाळ ग । आलं चहुंकडुन० ॥२॥
थंडिनें अंग कांकडेल ग । कडकड विज कडकडेल ग ।
अवचित मस्तकिं पडेल ग । पाहा बाइ, घर तुझें बुडेल ग ।
आतां नको थांबुं अंमळ ग । आलं चहुंकडुन० ॥३॥
आइविण लेंकरुं अनाथ ग । रडे दिनवाणी जनांत ग ।
मुखावरची काढ बनात ग । काय आहे सांग तुझ्या मनांत ग ।
डोळे पुसुन मुख कोमाळ ग । आलं चहुंकडुन० ॥४॥
नको नउं गोष्ट ही हंशांत ग । चालली धूळ पहा घशांत ग ।
विष्णुदास भरवशांत ग । ये जगदंबे अशांत ग ।
येउं दे कृपेची उबाळ ग । आलं चहुंकडुन० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP