मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
असं म्हणुं नको बाई

पद - असं म्हणुं नको बाई

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


असं म्हणुं नको बाई । रेणुके ! ॥धृ०॥
खचित सांगतें तुला नव्हे मी, दीनाची आई ॥ रेणुके० १॥
रे, चांडाळा दुर हो लागूं, नको मज सहसाही ॥ रेणुके० २॥
रे, पापिष्ठा तूं नको सहसा, पडुं माझ्या पायीं ॥ रेणुके० ३॥
रोग तुझा असाध्य आतां मी याला करुं कायी ॥ रेणुके० ४॥
नको करुं कटकट कपाळ कुटकुट, उठ कुणिकडे जाई ॥ रेणुके० ५॥
विष्णुदासासह नाव बुडो या, भवसागर डोहीं ॥ रेणुके० ६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP