मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ७८ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशीखंड - अध्याय ७८ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ७८ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ स्वामी म्हणे गा अगस्ति श्रोता ॥ तुज काशीखंड निरूपण करितां ॥ तें आदि अवसान आतां ॥ सांग पूर्वा पार ॥१॥जे जे कथा निरू पिली सविस्तर ॥ ते ते तूं मज संकलित सांगें प्रत्युत्तर ॥ मग तो महा मुनीश्वर ॥ वदता जाहाला स्वामीसी ॥२॥अगस्ति म्हणे स्वामिनाथा ॥ मज सविस्तर न ये पुण्य कथा ॥ स्वर्ग सरितेचे स्नान स्वार्था ॥ पशु केवीं जाणेल ॥३॥कल्पद्रुम महिमता ॥ केवीं फळती गा पांगार वृक्ष लता ॥ स्फटिक आणि मुक्तें पाहातां ॥ बहुतचि अंतर ॥४॥गरुडा चिया शक्ती प्रणाणें ॥ पक्ष पसरूं कपोत केवीं जाणे ॥ महा केसरीचीं पूर्ण मानें ॥ जंबूक केवीं जाणेल ॥५॥कमळतंतीं बंधन मातंगा ॥ कीं जैसी उगमीं सामावे गंगा ॥ कीं सूर्यास्त होय पूर्व भागा ॥ पश्चि मेहनी ॥६॥कीं त्या राहूसी बाधी शीतकर ॥ कीं तृणें लप विजे वैश्वानर ॥ वृष्टि करितां कर्दम कुमर ॥ नेणवे वरुण ॥७॥तें तुझें गुण गौरव अपार ॥ मज कथिलें न जाय सविस्तर ॥ चातक न प्राशी पृथ्वी नीर ॥ तैं ऐसें घडे ॥८॥नेणोनि स्वामी तुझा साक्षेप ॥ कैसे उजळती कोटि ब्रह्म दीप ॥ मग तें पुजितां शिव स्वरूप ॥ कां पां लक्ष वेना ॥९॥मज तप करितां काशी स्थानीं ॥ विघ्न केलें सुरेंद्रगीर्वाणीं ॥ मज अप्राप्त जाहाली धामिनी ॥ शिवाची काशी ॥१०॥तंव शुकादि प्रश्निती सत्यवती सुता ॥ वेदव्यास वदे पुराण कर्ता ॥ अगस्तीसी स्वामी प्रश्नितां ॥ निरूपिली कथा ॥११॥ तप करितां अगस्ति ऋषी ॥ त्यासी अप्राप्त जाहाली कां काशी ॥ व्यास तो निंदा दोषें महा ऋषी ॥ घातला काशी बाहेरी ॥१२॥ऐसें शुक वैशंपायानांचें बोलणें ॥ गुरूजी प्रश्निलें भावें पूर्णें ॥ मग तो वदला कृष्ण द्वैपायन मनें ॥ परियेसीं शुका मूर्ती ॥१३॥आधींचि आनंदवन काशी ॥ तेथें तप करितो अगस्ति ऋषी ॥ महा ऋषी मध्यें म्हणिजे त्यासी ॥ तपें अग्रगण्य ॥१४॥अगस्तीचे तपाच्या राशी ॥ स्वर्गीं आश्चर्य वर्तलें देवांसी ॥ मग ते सकळ देवेंसीं ॥ गेले सत्य लोका ॥१५॥मग ब्रह्म यासी वदे वज्र पाणी ॥ तप करी तसे अगस्ति मुनी ॥ जाहाले छत्तीस सहस्त्र तरणी ॥ या अगस्ती देखतां ॥१६॥मग तया चिया तपाची गणिता ॥ कवण संख्या करील विधाता ॥ तो कवणाचें पद घेईल आतां ॥ दीर्घ भांडवली हा असे पैं ॥१७॥अपार तयाची पुण्य सामुग्री ॥ तप स्थान करी काशी नगरी ॥ विशेषें शिव नाम उच्चारी तेथें काय न्य़ून पदार्थ ॥१८॥इतुकें सहस्त्राक्षाचें बोलणें ॥ भावें परिसिलें चतुराननें ॥ मग देवेंद्रासी प्रतिवचनें ॥ वदता जाहाला ब्रह्मा ॥१९॥अगस्तीची तप सामग्री अपार ॥ आणि तप स्थळ तें काशी पुर ॥ समीक्षा करिता जाहाला सृष्टिकर ॥ अगस्तीचे तपाची ॥२०॥मग ब्रह्मा म्हणे सहस्त्र नयना ॥ तो माझेंचि पद घेईल जाणा ॥ मी भीत असे तपस्वी ब्राह्मणां ॥ आणि या शिव पूजकां ॥२१॥मज नाहीं त्याचा विश्वास ॥ हा माझिया पदाचा करील नाश ॥ तरी सहस्त्राक्षा ॥ परियेसीं आयास ॥ या शिव भक्तीचा ॥२२॥पूर्वीं उद्भवला होता त्रिपुरासुर ॥ त्य़ानें लिंग स्थापिलें त्रिपुरेश्वर ॥ मग प्रसन्न जाहाला विश्वेश्वर ॥ त्या त्रिपुरासी पैं ॥२३॥मागुती उत्थापिलें शिवासी ॥ क्षय केला माझिया सृष्टीसी ॥ मग प्रयास जाहाला महादेवासी॥ सृष्टी रक्षितां ॥२४॥तेणें कुरुक्षेत्रीं याग मांडिला ॥ यागीं अगस्ति ऋषी आचार्य केला ॥ तैं सूर्य पूर्णा हुतीं घातला ॥ या अगस्तीनें ॥२५॥मग यागां तूनि काढिला रहंवर ॥ तें अगस्तीचें तप सार ॥ मग शिवें कापिला तो त्रिपुर ॥ अगस्तीच्या तपोबळें ॥२६॥अदिति कश्यपांचे जे कुमर ॥ हिरण्य कश्यप हिरण्याक्ष असुर ॥ त्यांहीं तप केलें दुर्धर ॥ वाराणसी मध्यें ॥२७॥मग ते असुर महा द्भुत ॥ त्यांहीं पृथ्वीसी केला कल्पान्त ॥ सृष्टीसी संहारूनि कश्य पसुत ॥ परा भविलें देवांसी ॥२८॥मनीं धाक घेऊनि मुरारी ॥ दैत्यांची स्पर्धा धरूनि शरीरीं ॥ वैकुंठ सांडूनि क्षीर सागरीं ॥ केलें शयन ॥२९॥अष्टा विंशति युगें शार्ङ्गधर । गुप्त राहिला होता मौनाचार ॥ मग घेऊनि वराह नार सिंहा वतार ॥ वधिलें तयां ॥३०॥ आणि भस्मा सुरें शंकर पूजिला ॥ तो भस्मा सुरासी प्रसन्न जाहाला ॥ मग कुबुद्धि संगें उत्था पिला ॥ शंकर तेणें ॥३१॥धरिला शिव शक्तीचा अभिलाष ॥ शंकराचा करूं म्हणे नाश ॥ दोन सहस्त्र वर्षें महेश ॥ पळत होता पैं ॥३२॥मग श्रीहरि होऊनि मोहिनीरूप ॥ तेणें दैत्य मारिला करोनि साक्षेप ॥ तंव तो विश्वंभर शिव स्वरूप ॥ तेथेंचि होता ॥३३॥तेणें चक्षीं देखिली ती मोहिनी ॥ मग तो वीर्य द्रवला शूलपाणी ॥ तेथें प्रकटला तो वृषभवहनी ॥ एका दशावा रुद्र ॥३४॥आणिक जो भृगूचा कुमर ॥ तपें अग्रज च्यवन ऋषीश्वर ॥ त्यासी प्रसन्न जाहाला शंकर ॥ शंका बाधे देवां ॥३५॥आणि तो मृत्यु लोकीं कुशना भराजा ॥ तेणें प्रसन्न केलें वृषभध्वजा ॥ मागीतल्या एक सहस्त्र आत्मजा ॥ कन्या रूप तेणें ॥३६॥तो करूं पाहे शत सहस्त्र यज्ञ ॥ घेतो वैकुंठ कीं माझें भुवन ॥ मग म्यां नारद मुनी कारण ॥ पाठ विलें तेथें ॥३७॥मग त्या कुशना भाचिया कन्या ॥ शिव दत्त स्वरूप लावण्या ॥ त्या नारदें दिधल्या महा मान्या ॥ च्यवन ऋषी श्वरा ॥३८॥त्या नंतरें आला अगस्ति ऋषी ॥ कुशना भराज कन्या मागा वयासी ॥ तेणें पुत्रचि दिधला तयासी ॥ ते जाहाली लोपा मुद्रा ॥३९॥म्हणोनि अगस्तीची तप शक्ती ॥ कवण लक्षी गा सुरपती ॥ तो माझें पद घेईल अगस्ती ॥ हें सत्य जाणा ॥४०॥ऐसेंचि गाधि सुतें तप साधिलें ॥ त्या विश्वा मित्रें आम्हांसीं वैर केलें ॥ शिवाची भक्ति करूनि सिद्धी नेलें ॥ अनुष्ठान तेणें ॥४१॥त्यासी प्रसन्न जाहाला धूर्जटी ॥ त्यानें दुसरी आरं भिली सृष्टी ॥ तैसाचि हा अगस्ति कपटी ॥ करील तिसरी सृष्टी ॥४२॥ब्रह्मा म्हणे गा सहस्त्रनयना ॥ विग्रह कीजे त्याचे अनुष्ठाना ॥ आतां काशी अप्राप्त कीजे त्या ब्राह्मणा ॥ एकुणतीस द्वापरें ॥४३॥मग त्यासी व्यासचें पद देऊन ॥ कथील अष्टादश पुराण ॥ मग वाराण सीसी होईल पावन ॥ महा ऋषी तो ॥४४॥आणिका तीर्थांची तप साधना ॥ काशी अधिक कल्प गुणा ॥ म्हणोनि काशी स्थानीं त्या ब्राह्मणा ॥ राहों न दीजे ॥४५॥मृत्यु लोकीं जो तप करी ॥ तो सुरेंद्राचा पूर्ण वैरी ॥ पैजा उठावती स्वर्गावरी ॥ महात पोबळें ॥४६॥म्हणोनि परिसा रे देव हो ॥ त्यासी आधींचि करा विग्रहो ॥ पूर्ण होईल तप संग्रहो ॥ मग नावरे तो देवां ॥४७॥विचारणा देखोनि वेदांतीं ॥ उपायें उठवावा तो अगस्ती ॥ बलात्कारें तरी तयावरी शक्ती ॥ न चले देवांची ॥४८॥भक्ति भावें प्रसन्न होतसे देव ॥ तेथें बळ शक्ति किमर्थ संदेह ॥ विरोधें होतसे परा भव ॥ शरीर प्राणांसी ॥४९॥समर्थ गोविजे भाक दाना ॥ तप स्वियाच्या घेईजे शब्द गुणा ॥ राजा प्रार्थिंजे समय पाहोनि जाणा ॥ वरूण वृष्टी जैसा ॥५०॥मी पाठ वितों नारद मुनी ॥ एकादा उपाय देखों मेदिनीं ॥ मग तो विधि आज्ञें ब्रह्म ज्ञानी ॥ नारद आला पैं ॥५१॥तेणें खवळिला विंध्याद्री ॥ तो सुवर्णा चलासीं स्पर्धा करी ॥ पाहोनि गुणें विरोध अंगीकारी ॥ तितु काही होय ॥५२॥व्यास म्हणे शुक वैशं पायना ॥ रावणें निरो धिलें त्या गीर्वाणां ॥ सुरेंद्र देव घातले आंकणां ॥ बहुकाळवरी पैं ॥५३॥कृत त्रेता द्वापर कलि जाणा ॥ हीं चतुर्दश वेळ आलीं पूर्णा ॥ तंववरी देव होते बंदिखानां ॥ त्या लंका दुर्गीं पैं ॥५४॥म्हणोनि रंकासी न कीजे बळ ॥ अशक्ताचा पाठिराखा जाश्वनीळ ॥ समय पाहोनि काळ वेळ ॥ तो घात चिंती तसे ॥५५॥म्हणोनि आचार स्थापिजे शास्त्रनीतीं ॥ वेव्हार कल्पिजे राज्य स्थिती ॥ शांति क्षमा नम्र भाव भक्ती ॥ सर्वत्रीं कल्पिजे ॥५६॥आचार स्थापिजे पाहोनि शास्त्रीं ॥ तो आचार फळे इह परत्रीं ॥ प्रपंच करूं तो व्यर्थ जगत्रीं ॥ सर्वां परी निष्फळ ॥५७॥शुद्ध विचार तो सत्संग ॥ आप बुद्धि तोचि अमार्ग ॥ हा चुक विजे अधःपात प्रसंग ॥ श्रीमंता दिकीं ॥५८॥राज नीति पाहोनि कीजे वेव्हार ॥ गुरु मुखें विण न कीजे निर्धार ॥ कार्य कीजे न म्हणिजे उंच थोर ॥ पाहोनि समय ॥५९॥युद्ध कीजे परदळ पाहूनि भूप्रीं ॥ पुरुषार्थ दाख विजे स्वामी ॥ मग झुंजिजे संग्रामीं ॥ तें महा सार्थक ॥६०॥आतां असो हा वेव्हारू ॥ स्वामीसी प्रार्थी मुनीश्वरू ॥ विंध्या द्रीनें न्यून केला मेरू ॥ हरिला मान देवां मध्यें ॥६१॥तरी प्रथम निरू पिली ते कथा ॥ येणें निरोधिलें पश्चिमपंथा ॥ सोम सूर्य तारा ग्रहांसी व्याथा ॥ केली विंध्याद्रीनें ॥६२॥मग देव गेले ब्रह्मया पासीं ॥ वृत्तान्त जाण विला विधीसी ॥ तेणें सद्बुद्धीं उपदे शिलें देवांसी ॥ निघते झाले तेथूनी ॥६३॥मग ते काशी मार्ग धरोनि चित्तीं ॥ प्रवेशते जाहाले अवि मुक्तीं ॥ विघ्न करा वया आम्हां प्रती ॥ आले प्रतापें ॥६४॥मग शून्य देखिलें गिरीसी जाण ॥ विशेष स्वर्ग सरितेचें स्नान ॥ मग विश्वश्वराचें पूजन ॥ तें कल्प फळीं अधिक ॥६५॥मग नाना दानें करूनि त्यांहीं ॥ सत्पात्रें तृण केलीं सर्वही ॥ जीं सर्व दानें बोलिलीं पाहीं ॥ वेद पारा यणीं ॥६६॥मग आले आमुचे गुंफाद्वारीं ॥ तेथें साष्टांग घातला क्षिती वरी ॥ मग विज्ञापना प्रत्युत्तरीं ॥ करिते जाहाले ॥६७॥जे विंध्याद्रीनें केली विपत्ती ॥ ते सांगितली आम्हां प्रती ॥ मग वाखाणिली आमुची स्तुती ॥ महा तपश्री जे ॥६८॥तरी ते पुरुषार्थी दिक्पाळ ॥ पाहातां न्यून त्यांचें बळ ॥ जें विंध्याद्रीचें दुःख सकळ ॥ सांगों आले आम्हां पुढें ॥६९॥तरी आमुची तप सामग्री होती ॥ मग नाभीकार दिधला तयां प्रती ॥ सामग्री असोनि परोपकार वंचिती ॥ ते महाद्रोही पैं ॥७०॥ त्यांचें कार्य करूं म्हणितलें ॥ मग देवीं स्वर्गासी गमन केलें ॥ परी आम्हांसी अप्राप्त जाहालें ॥ आनंद वन ते काशी ॥७१॥मग कांते सहित झडकरी ॥ आम्हीं निघालों गुंफे बाहेरी ॥ मग मीं विचारिलें ते अवसरीं ॥ सर्व देव स्मरणा ॥७२॥मग आम्हीं विंध्याद्री जवळा ॥ तंव सानरूप देखिलें त्या शैला ॥ जेणें स्पर्धा केली मेरु मंडळा ॥ वरुता चार कोटी ॥७३॥तेथें तप सामग्रीचा वेंच केला ॥ विंध्याद्रि भूमिगर्भीं सामा विला ॥ मग आम्हीं दक्षिण मार्ग क्रमिला ॥ तुमचे श्रद्धेसी पैं ॥७४॥गोदेचें करूनियां स्नान ॥ तेणें शांत केला माझा वियोगाग्न ॥ मग भवानीचें घेतलें दर्शन ॥ त्या कोल्हापुरीं ॥७५॥मग तियेसी केला नमस्कार ॥ प्रसन्न माता बोलिली वर ॥ ऐसा मज दिधला नाभीकार ॥ काशी प्राप्त व्हावया ॥७६॥एकुणतिसाव्या द्वापरा उपरी ॥ तुज प्राप्त होईल काशी पुरी ॥ ऐसें वदली ते भवानी सुंदरी ॥ तो माझा पुण्यो दय ॥७७॥मग तेथूनि निघालों वेगेंसीं ॥ आलों श्रीशैल पर्वतासी ॥ केलें स्नान पाताळ गंगेसी ॥ तें महा पुण्य तीर्थ ॥७८॥देखिलें मल्लिकार्जु नाचें शिखर ॥ तेणें स्वार्थ जाहाला थोर ॥ मज प्राप्त होईल काशीपुर ॥ हें शिखर देखि लिया ॥७९॥मल्लि कार्जुन जो पंचानन ॥ तो पूजिला हैमव तीरमण ॥ मग म्यां स्तविला त्रिनयन ॥ तंव झाली प्रसाद वाणी ॥८०॥प्रसादवाचा सांगे मज प्रती ॥ तुझी मज पूर्ण पावली भक्ती ॥ तुज प्राप्त होईल अवि मुक्ती ॥ हें सत्य जाण पां ॥८१॥तेथें मज प्रश्न केला कांतेनें ॥ या मल्लिका र्जुनीं राहूं आपण ॥ मुक्ती स्तव कल्पिजे काशी भुवन ॥ ते मुक्ति हें शिखर देखतां ॥८२॥तरी ते म्हणे येथेंचि राहूं निश्चित ॥ काशीचे कायसे प्रयास ॥ हा लिंग पर्वतींचा महेश ॥ पूजं मल्लिका र्जुन ॥८३॥मग तुम्हीं पूर्वापारीं जें निरूपिलें ॥ तें आम्हांसी श्रवण होतें केलें ॥ तेंचि लोपा मुद्रेसी निरूपिलें ॥ पूर्वार्ध जें कां ॥८४॥शिव शर्मा ब्राह्मण मथुरा निवासी ॥ तो होता सर्व विद्या अभ्यासी ॥ नाना दानें घडलीं त्यासी ॥ परी तो निंदी आपणातें ॥८५॥मग जे मंदाकिनी मूळ माया पुरी ॥ तेथें तीर्थीं शिव शर्मा स्नान करी ॥ मग अक स्मात व्याषला ज्वरीं ॥ जाहालें देहदहन ॥८६॥त्या पुण्या चेनि सामर्थ्यें पूर्ण ॥ त्यासी वैकुंठाहूनि आलें विमान ॥ सवें श्रीनारायणाचे गण ॥ सुशील पुण्य शील जे ॥८७॥तैं निमाला तो शिव शर्मा ॥ लिंग शरीरीं घातला त्याचा जीवात्मा ॥ मग तो भेटा वया पुरुषोत्तमा ॥ नेते झाले गणोत्तम ॥८८॥विमानीं घातलें शिव शार्म्यासी ॥ पुष्पक चालिलें आकाशीं ॥ मार्गीं लोक देखता झाला तयासी ॥ तो प्रश्नी विष्णु गणां ॥८९॥प्रथम देखिला स्थूल लोक ॥ मग प्रश्निता झाला तो द्विज नायक ॥ विष्णु गण सांगती कौतुक ॥ सुशील पुण्य शील ते ॥९०॥शिव शर्म्यासी सांगती गण ॥ या मृत्यु लोकींचे महा कृपण ॥ आपपर वंचिती द्र्व्य असून ॥ त्यांसी येथें वास ॥९१॥यापुढें पिशा चलोक देखिले ॥ तेव्हां शिव शर्म्यानें गणांसी प्रश्निलें ॥ मग त्या गणवीरीं त्यासी निरूपिलें ॥ सविस्तर कैसें तें ॥९२॥हे मृत्यु लोकींचे महा पापराशी ॥ शिवें ठेविले या लोकासी ॥ ते घातले महा अटकेसी ॥ ब्रह्मार्णवीं पैं ॥९३॥त्या पुढें लोक देखिला अप्सरा ॥ त्या सुरांगना अति सुंदरा ॥ त्या निघा लिय मथितां सागरा ॥ गर्भींहूनि पैं ॥९४॥त्यांचें आदि अवसान प्रश्निलें ॥ तें हरि गणीं शिव शर्म्यासी कथिलें ॥ विमान पुढें जंव क्रमिलें ॥ तंव देखिला यम लोक ॥९५॥तो सूर्य संज्ञाचा आत्मज ॥ लवणा सुराचा अरी महिष ध्वज ॥ तो शिव शर्म्य़ासी गरुड ध्वज ॥ दूत निरूपिते जाहाले ॥९६॥सांगीतलें यम पुरीचें गुण वर्णन ॥ द्वारें दुर्ग उंची ताल विस्तीर्ण ॥ यम पुरीचे मार्गीं यातना दारुण ॥ निरूपिली गणीं ॥९७॥ऐसी यम पुरीची दिव्य रचना ॥ ते सविस्तर कथिला ब्राह्मणा ॥ जे जे कथा सांगीतली विष्णु गणां ॥ ते ते दुर्लभ त्रिभुवनीं ॥९८॥पुढती विमान चाले जंव गगनीं ॥ सूर्य लोक देखिला नयनीं ॥ तें शिव शर्म्यासी विष्णु गणीं ॥ कथिलें कैसें ॥९९॥कथिला गभस्तीचा महिमा पूर्ण ॥ जो सृष्टिकार्यासी करी भ्रमण ॥ कथिला उदय अस्त अर्ध्यदान ॥ त्रिकाळाचें पैं ॥१००॥पुढें विमान चाले शीघ्रगती ॥ तंव देखिली अमरावती ॥ तेथींचा जो स्वामी सुरपती ॥ सहस्त्राक्ष तो ॥१०१॥तो अदिति कश्यपांचा कुमर ॥ चौदा मन्वंतरें आयुषी सुरवर ॥ चतुर्दश रत्नें घरीं परिवार ॥ तेहतीस कोटी देव पैं ॥१०२॥जें अमरावतीचें गुण वर्णन ॥ हेम मंदिरें द्वादश लक्ष प्रमाण ॥ सुरपतीचें ऐश्वर्य संपूर्ण ॥ सांगीतलें गणीं ॥१०३॥ऐसी समूळ निरूपिली कथा ॥ जे परा भवी किल्बिषव्यथा ॥ ते गणीं कथिली द्विजनाथा ॥ शिव शर्मि यासी ॥१०४॥मग विमान जातां गंगनोदरीं ॥ तंव पुढें देखिली अग्निपुरी ॥ ते जन्म भूमि अवधारीं ॥ गार्ह पत्याची ॥१०५॥तेथें वैश्वानर ब्राह्मणाचा कुमर ॥ जन्मला गार्हपत्य अंगार ॥ विष्णु गणीं सांगीतला सविस्तर ॥ शिव शर्म्यासी पैं ॥१०६॥तेणें शिवाची भक्ति केली पूर्ण ॥ मग हें पद पावला हुताशन ॥ याग विधि करा वया कारण ॥ मही मंडळी पैं ॥१०७॥स्वामी म्हणे गा अगस्ति मुनी ॥ तुज ऐसा श्रोता नाहीं त्रिभुवनीं ॥ जे काशीखंड कथा अंतःकरणीं ॥ धरिली महाद्दढ ॥१०८॥तरी पुढें कथा कैसी धरिली मानसीं ॥ ते आम्हां श्रवण करीं गा अगस्ति ऋषी ॥ जेणें श्रवणे अहर्निशीं ॥ परा भवती दोष ॥१०९॥या अध्यायाची सांगों फल श्रुती ॥ पुर्वज कैलासीं अमृत पान करिती ॥ इच्छा भोजनें केली तृप्ती ॥ सहस्त्र एक सत्पात्रांची ॥११०॥भाद्रपद वद्य अमावा स्येसी ॥ रवि ग्रहण होतां कुरुक्षेत्रासी ॥ त्या तीर्थीं जाय जो पुत्रपैत्रेंसीं ॥ सुवर्णतुळा दान दीजे ॥१११॥ऐसें जें घडे अपार पुण्य ॥ करितां अध्याय श्रवण पठन ॥ वाराणसी विमुक्ती संपूर्ण ॥ घडे जी सत्य ॥११२॥हा अध्याय श्रवण पठन जयासी ॥ सहस्त्र गोदानें तुळती स्पर्धेसीं ॥ चतुर्वेद श्रवण त्यासी ॥ जहाले सत्य ॥११३॥हा अध्याय जया होय श्रवण पठन ॥ तेणें सेतुबंधीं केलें धारा स्नपन ॥ समर्पिलें भागी रथीचें जीवन ॥ सहस्त्र कुंभ ॥११४॥ सहस्त्र अनुष्ठान ॐ कारेश्वरीं ॥ जेथें संगम नर्मदा कावेरी ॥ तेथींचीं स्नानें लक्षवरी ॥ हा अध्याय श्रवण पठनें ॥११५॥आणि सहस्त्र ब्रह्महत्या नातरी ॥ गोहत्याही सहस्त्र कां न होती ॥ गोत्रह त्याही पंचशती ॥ होईनात कां ॥११६॥इत्यादि पापें जयासी ॥ घडलीं असती जरी देहासी ॥ आणि कही पंच महा दोषी ॥ सर्व भस्म होती श्रवण पठनें ॥११७॥नासती सहस्त्र जन्मींचे दोष ॥ नसती कन्या विक्रय दोष ॥ मात्रा गमन इत्यादि दोष ॥ नासती श्रवण मात्रें ॥११८॥परी एकाग्र करोनि मन ॥ तैसेंचि आचरावें जाण ॥ कुवासना सांडूनि पूर्ण ॥ सत्संगीं रमिजे ॥११९॥सत्पात्रीं दीजे द्रव्यदान ॥ तैसेंचि अन्न वस्त्रदान ॥ समद्दष्टीं पाहावे जी जन ॥ तरी फल श्रुति सत्यचि ॥१२०॥ऐकिल्या सारिखें वर्तणें ॥ सर्वां भूतीं भक्ति भाव धरणें ॥ सर्वां घटीं सम पाहाणें ॥ देव अहर्निशीं ॥१२१॥हें काशीखंड भावें करी श्रवण ॥ त्याची मन कामना होय पूर्ण ॥ अपुत्रा होईल पुत्रसंतान ॥ निर्धना धन प्राप्ती ॥१२२॥ज्या ज्या भावें करी श्रवणा ॥ ते ते पूर्ण होईल मन कामना ॥ इच्छिलें फल प्राप्त जाणा ॥ देईल काशी राज ॥१२३॥हें अनृत नाहीं नाहीं ॥ व्यासवाणी सत्य पाहीं ॥ अंतीं कैला सपद पाहीं ॥ देतसे शिव स्वामी ॥१२४॥आतां तो महा ऋषी अगस्ती ॥ कवण कथा निरूपील स्वामी प्रती ॥ ते एकाग्र परिसावी मतीं ॥ म्हणे शिव दास गोमा ॥१२५॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ग्रंथमाहात्म्यवर्णनं नाम अष्टसप्ततितमाध्यायः ॥७८॥॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥॥ इति अष्टसप्ततितमाध्यायः समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP